Take a fresh look at your lifestyle.

सावधान…! ते अॅप केले असेल डाऊनलोड तर वेळीच व्हा सावध…अन्यथा एका मिनिटात व्हाल कंगाल…वाचा नेमकी काय खबरदारी घ्यावी…

मोबाईल वापरकर्त्याला फिशिंग वेबसाईट एसएमएसद्वारे पाठवल्या जातात. त्या लिंक भारत सरकारच्या आयकर विभागासारख्या असल्याने सामान्य नागरीक त्यांच्या जाळ्यात अडकतो.

दिल्ली : तंत्रज्ञानाच्या शोधाने माणसांची अनेक कामे एका क्लिकवर व्हायला लागले. पण तंत्रज्ञान चांगल्या गोष्टींसोबत वाईट गोष्टी घेऊन आपल्याकडे येत असते. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करताना आपण पुर्ण काळजी घेतली पाहिजे. तसेच आपण एका क्लिकवर वीजबील, पैसे पाठवण्याची कामे करतो. मात्र आपलं काम सोपं करणारं तंत्रज्ञानच अनेकांसाठी घातक ठरत आहे.

Advertisement

तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याबाबत तसेच ऑनलाईन फसवणूकीच्या प्रकारापासून वाचण्यासाठी सायबर पोलिस कायम सुचित करत असतात. मात्र सायबर गुन्हेगारांनी वापरलेले अनेक फंडे यांमुळे पोलिसांपासून ते सर्वजणच हतबल झाल्याचे आपण पाहतो. सध्या तंत्रज्ञानाच्या युगात मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन गंडा घातला जातो. अनेकांना लाखो रूपयांवर पाणी सोडावे लागते. त्यामुळे आपण वेळीच सावध व्हायला हवं.

Advertisement

सध्या CERT-In नुसार Drinik मालवेअर भारतीय नागरीकांना टार्गेट करत आहे. तर हा एक बँकींग ट्रोजन मोबाईलची स्क्रीन फिशिंग करून आपली माहिती संंबंधीत हॅकरकडे पोहचवतो. तसेच यासाठी त्यांनी इनकम टॅक्स रिफंडचे अमीष दाखवले जाते. तर इनकम टॅक्स रिफंडसंदर्भातील जाळे टाकून त्यात तो मालवेअर तुमच्या मोबाईलमध्ये घुसवला जातो.

Advertisement

मोबाईल वापरकर्त्याला फिशिंग वेबसाईट एसएमएसद्वारे पाठवल्या जातात. त्या लिंक भारत सरकारच्या आयकर विभागासारख्या असल्याने सामान्य नागरीक त्यांच्या जाळ्यात अडकतो. त्यानंतर त्याठिकाणी माहिती भरायला सांगितली जाते आणि एपीके फाईल डाऊनलोड करायला सांगितली जाते व अॅप इंस्टॉल करण्याच्या सुचना दिल्या जातात. वापरकर्ता त्या सुचनानुसार कारवाई करतो. मात्र मालवेअर इंस्टॉल करत असताना काही परमिशन मागितल्या जातात. त्या परमीशन दिल्यानंतर एक फॉर्म उघडतो. ज्यामध्ये ड्रिनिक युजरची माहिती विचारली जाते. त्यामध्ये  वापरकर्त्याचे नाव. इमेल, पत्ता, पॅन कार्ड नंबर, मोबाईल नंबर, आधार नंबर, जन्म तारीख ही माहिती चोरायला सुरूवात करतो. तसेच यासोबत डेबिट आणि क्रेडीट कार्ड आणि बँकेची माहिती चोरतो.

Advertisement

फिशिंगसाठी वापरली जाणारे अॅप हे आयकर विभागाच्या मोबाईल अॅप सारखे दिसते. त्यामध्ये तुम्हाला पैसे भरण्यास सांगितले जातात. तर अशा प्रकारची रक्कम भरताना एरर आल्याचे नोटीफिकेशन येते. यावेळी हॅकर आपल्या कामाला सुरूवात करून एका मिनिटाच्या आत तुमचे बँक खाते आणि क्रेडीट कार्डमधील रक्कम लंपास करतो. त्यामुळे या ऑनलाईन गंडा घालणाऱ्यांपासून नागरीकांनी सावध रहावे, त्यासाठी कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply