Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो….! Google ही आता स्मार्टफोनच्या स्पर्धेत…आणणार अनोखे फिचर…वाचा…

गुगल ही तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी सेवा क्षेत्रातून उत्पादन क्षेत्रात उतरली आहे. आतापर्यंत काही सर्च करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्य़ा गुगलने आता स्मार्टफोनच्या निर्मीतीची घोषणा केली आहे

मुंबई : तंत्रज्ञानाचा विकास होत असताना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली. त्या स्पर्धेमुळे ग्राहकांना कमी किंमतीत चांगली सेवा मिळायला लागली. त्यामध्ये स्मार्टफोन ही प्रत्येकाची गरज असल्याने वेगवेगळ्या कंपन्या स्मार्टफोन बाजारात आणत आहेत. याच स्पर्धेत गुगलही दंड धोपटून उतरत आहे. त्यामध्ये अनोखे फिचर असल्याबाबत चर्चा सुरू आहेत.

Advertisement

गुगल ही तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी सेवा क्षेत्रातून उत्पादन क्षेत्रात उतरली आहे. आतापर्यंत काही सर्च करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्य़ा गुगलने आता स्मार्टफोनच्या निर्मीतीची घोषणा केली आहे. तर हा स्मार्टफोन फोल्डेबल असणार आहे. तसेच या गुगल फोल्डेबल पिक्सेल या मोबाईलचे कोडनेम पासपोर्ट असले तरी बाजारात या अनोख्या स्मार्टफोनचे नाव काय असणार याबाबत माहिती जाहीर करण्यात आली नाही.

Loading...
Advertisement

येत्या काळात फोल्डेबल स्मार्टफोनला भविष्य असल्याचे म्हटले जात आहे. तर आतापर्यंत सॅमसंग, मोटोरोला, हुवावे यांचे फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात येण्याची चर्चा सुरू आहे. तर सॅमसंगच्या फ्लिप आणि फोल्ड सीरीजला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभुमीवर आता गुगलही या कंपन्यांच्या स्पर्धेत उतरले आहे. तर गुगलच्या फोल्डेबल पिक्सेल स्मार्टफोनच्या बातम्या यायला सुरूवात झाली आहे. तर या वर्षाच्या अखेरपर्यंत गुगल आपला फोल्डेबल पिक्सेल स्मार्टफोन बाजारात आणू शकते.

Advertisement

इवान ब्लासने दिलेल्या माहितीनुसार गुगल येत्या ऑक्टोबरमध्ये पिक्सेल 6 चे लाँचिंग करणार आहे. त्यामध्ये पिक्सेल फोल्डेबल स्मार्टफोनची झलक पहायला मिळू शकते.  तसेच गुगल आपल्या फोल्डेबल पिक्सेल स्मार्टफोनवर दोन वर्षापासून काम करत आहे. तर हा फोन 2021 च्या अखेरपर्यंत बाजारात येऊ शकतो. तसेच  लीक झालेल्या ब्ल्यु प्रिंटमधून समोर आलेल्या माहितीनुसार हा फोन गॅॅलक्सी  फोल्ड सारखा असेल. तर या फोनमध्ये अंडर डिस्प्ले कॅमेरा देखील असू शकतो. तसेच या स्मार्टफोनसाठी गुगलला सॅमसंग मदत करत आहे. तर सॅमसंगकडून गुगलच्या फोल्डेबल स्मार्टफोनसाठी LTPO OLED पॅनल देण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply