Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाप रे…! तेथे मिळतात सर्वात स्वस्त iPhone…वाचा कोठे…

आताच टेक कंपनी असलेल्या अॅपल कंपनीने आपली iPhone ची सीरीज लाँच केली आहे. या सीरीजअंतर्गत अॅपलने चार मॉडेल लाँच केले आहेत. यामध्ये iPhone 13, iPhone 13 mini, iPhone 13 pro आणि iphone 13 Pro Max यांचा सामावेश होतो.

दिल्ली : आयफोन खिशात असणे हे श्रीमंतीचं लक्षण मानलं जातं. त्यामुळे श्रीमंतांपासुन ते मध्यमवर्गीयांपर्यंत सगळ्यांमध्येच आयफोन विषयीची क्रेझ आहे. हा आयफोन आपल्याकडे असावा हे अनेकांचं स्वप्न असतं. मात्र आयफोनच्या ब्रँडप्रमाणेच त्याच्या किंमतीही सर्वसामान्यांच्या क्षमतेपलिकडे असतात. मात्र काही ठिकाणी आयफोनच्या किंमती सगळ्यात स्वस्त आहेत.

Advertisement

आताच टेक कंपनी असलेल्या अॅपल कंपनीने आपली iPhone ची सीरीज लाँच केली आहे. या सीरीजअंतर्गत अॅपलने चार मॉडेल लाँच केले आहेत. यामध्ये iPhone 13, iPhone 13 mini, iPhone 13 pro आणि iphone 13 Pro Max यांचा सामावेश होतो. कंपनीने या फोन्सच्या किंमती आणि त्यातील उपलब्धतेची माहिती दिली आहे. त्यामुळे iPhone प्रेमी सध्या प्री बुकींग आणि डिलिव्हरीची वाट पाहत आहेत. मात्र iPhone 13 च्या सीरीजची किंमत वेगवेगळ्या देशात वेगवेगळी आहे. त्यामध्ये iPhone 13 Mini बेसिक मॉडेल 128 GB ची किंमत 1301.56 डॉलर इतकी आहे तर ती अमेरीकेपेक्षा तब्बल 572 डॉलर अधिक आहे.

Loading...
Advertisement

अमेरीका, जपान, कॅनडा आणि हाँगकाँगमध्ये iPhone 13 च्या किंमती सर्वात कमी आहेत. ब्राझील, तुर्की, स्वीडन आणि भारतात iPhone13 च्या किंमती सर्वाधिक आहेत. भारतात iPhone 13 mini बेसिक मॉडेल 128 GB ची किंमत 69 हजार 990 रूपये इतकी आहे. तर iPhone 13 ची सुरूवातीची किंमत 79 हजार 900 रूपये, iPhone 13 Pro ची किंमत 1 लाख 19 हजार 900 रूपये iPhone 13 Pro Max ची किंमत 1 लाख 29 हजार 900 रूपये इतकी आहे.

Advertisement

भारतात iPhone 13 च्या किंमती जास्त असण्याचे कारण म्हणजे भारत सरकारने iPhone 13 वर लावलेला आयात कर आणि डॉलरच्या तुलनेत भारताच्या रूपयाची किंमत यावरून भारतात iPhone 13 ची किंमत ठरते. भारतात डॉलरच्या तुलनेत रूपयाची किंमत कमी असल्याने आणि भारताचा आयात कर जास्त असल्याने भारतात iPhone किंमत जास्त आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply