Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सावधान..! तुमच्या मुलांची माहिती हॅकर्सपर्यंत पोहचली असेल तर…जाणून घ्या काय करायचं

कोरोनाच्या संकटात वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन शिक्षणामुळे बहुतेकवेळा लहान मुलांच्या हाती मोबाईल असतो. त्यामुळे हॅकर्स मुलांची माहिती घेऊ शकतात.

मुंबई : कोरोना महामारीमुुळे जास्तीत जास्त लोकांना आपल्या घरूनच काम करावं लागत आहे. तसेच लहान मुलांच्या शाळा बंद असल्याने त्यांचे शिक्षणही ऑनलाईनच सुरू आहे. त्यातच हॅकर्सकडून सामान्य लोकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक सुरू आहे. या वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन शिक्षणामुळे तुमच्या मुलांवर हॅकर्स नजर ठेऊन असतात. त्यामुळे तुमच्या मुलांची माहिती हॅकर्सपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. जर अशी माहिती हॅकर्सपर्यंत पोहचली तर त्याचा मोठा तोटा होऊ शकतो.

Advertisement

कोरोनाच्या संकटात वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन शिक्षणामुळे बहुतेकवेळा लहान मुलांच्या हाती मोबाईल असतो. त्यामुळे हॅकर्स मुलांची माहिती घेऊ शकतात. सध्या पालकांना आर्थिक चणचण जाणवत असतानाच रॅन्समवेअर हल्ल्याची शक्यता निर्माण होत आहे. तर गेल्या वर्षभरात लहान मुलांच्या शाळांवर सायबर हल्ले होत आहेत.

Loading...
Advertisement

सायबर हल्ल्यात लहान मुलांचे नाव, पत्ता, जन्मतारीख, जात, आधार क्रमांक, लिंग, ते स्थलांतरीत आहेत का?, बेघर आहेत का? किंवा आर्थिकदृष्ट्या वंचित आहेत का? याची माहिती घेतली जाते.  तर एफबीआयच्या रिपोर्टनुसार त्यांनी मागितलेली रक्कम ने दिल्याने हॅकर्सने 1200 शाळांमधील लहान मुलांची माहिती डार्क वेबवर पोस्ट केली.

Advertisement

हॅकर्सकडून अशी माहिती चुकीच्या कामांसाठी वापरली जाऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांची माहिती क्रेडीट कार्ड आणि कार कर्ज मिळवण्यासाठी वापरली जाऊ शकते. त्यामुळे पालकांवर आणि लहान मुलांवर त्याचा गंभीर परीणाम होऊ शकतो. त्यामुळे आधीच आर्थिक चणचणीत असलेल्या पालकांसमोर डेटा सुरक्षा आणि गोपनियतेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. मात्र यातून बाहेर पडण्यासाठी क्रेडीट कार्ड गोठवणे हा एकमेव पर्याय आहे, असे तज्ज्ञांचं मत आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply