Take a fresh look at your lifestyle.

ऑनलाईन चूना लावणाऱ्या टग्यांचा पर्दाफाश..वाचा पोलिसांची मोठी कारवाई…

दिल्लीत सायबर गुन्हेगारांनी हैदोस घातला होता. मात्र दिल्ली पोलिसांनी सायबर गुन्हेगारांच्या चांगल्याच मुसक्या आवळल्या आहेत.

दिल्ली : सध्या जगभरात ऑनलाईन माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या तंत्रज्ञानाच्या चांगल्या गुणधर्माला चिकटून गोचिडाप्रमाणे वाईट गुणधर्मही वाटचाल करत आहे. त्यात अनेकांची फसवणूक होते. अशा फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्यासाठी सायबर पोलिस सातत्याने आवाहन करतात. मात्र तरीही अशा सायबर गुन्हेगारांच्या तावडीत अनेक लोक सापडतात आणि आपली फसवणूक करून घेतात.

Advertisement

सायबर गुन्हेगारांना पकडतांना पोलिसांना मोठी कसरत करावी लागते. मात्र काही सायबर गुन्हेगार सापडतात तर काही पोलिसांना चकवा देत आपला काळा धंदा सुरूच ठेवतात. अशाच प्रकारे राजधानी दिल्लीत सायबर गुन्हेगारांनी हैदोस घातला होता. मात्र दिल्ली पोलिसांनी सायबर गुन्हेगारांच्या चांगल्याच मुसक्या आवळल्या आहेत.

Advertisement

अनेक नामांकित ब्रँडच्या नावाने बनावट वेबसाईट काढून त्याद्वारे अनेक नागरीकांची फसवणूक केली जात होती. त्यामुळे नामांकित ब्रँडच्या नावालाही बट्टा लागत होता. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी अनेक नामांकित ब्रँडच्या नावाने बनावट वेबसाईट चालवमाऱ्या सायबर ठगांच्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे.

Advertisement

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी व्यावसायासाठी इच्छुक असलेल्या नव व्यावसायिकांना डीलरशीप देऊन फसवत असे. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी या फसवणूक करणाऱ्या टोळीतील चार टाळक्यांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडे असलेले तब्बल 117 बँक अकाऊंट सील केले आहेत. तर या टोळीने 16 राज्यांमध्ये आपले हातपाय पसरत तब्बल 126 जणांना गंडा घातला आहे.

Advertisement
  • सायबर गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी अधिकृत वेबसाईटवरूनच व्यवहार करावेत.
  • तसेच अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करू नये.
  • अनोळखी लिंकवर क्लिक करू नये.
  • तुम्हाला हव्या असलेल्या अधिकृत वेबसाईट बुकमार्क करून ठेवाव्यात.
  • बँक  आधार कार्ड, ओटीपी आणि वैयक्तिक माहिती कोणालाही शेअर करू नये.

Advertisement

Leave a Reply