Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

फेसबूकवर आता तसला कंटेन्ट पाहिल्यास होणार कडक कारवाई, पाहा काय निर्णय घेण्यात आलाय…?

नवी दिल्ली : सध्याच्या काळात सोशल मीडिया माणसाच्या जगण्याचा एक भाग झाला आहे. दिवसातील बराचसा वेळ अनेक जण सोशल मीडियावरच पडीक असतात. त्यावर पोस्ट शेअर करणे, विनोद करणे, एखाद्याला ट्रोल करणे, व्हिडीओ पाहण्याचे काम सुरू असते. काही टवाळखोर जाणीवपूर्वक दोन समाजात तेढ निर्माण होईल, असा कंटेन्ट पसरविण्याचे काम करीत असतात. त्यातून विकृत आनंद मिळवितात.

Advertisement

दरम्यान, फेसबुकने (Facebook) आता आक्षेपार्ह किंवा फेक कंटेंट, तसेच हिंसक, द्वेषपूर्ण व्हिडीओ पाहणाऱ्या युजर्सना इशारा देण्यास सुरुवात केली आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये एक नोटिस दाखविली आहे.

Advertisement

एखादी व्यक्ती आक्षेपार्ह, फेक किंवा द्वेषपूर्ण कंटेंट (Harmful Extremist Content) पाहत असल्याचे आढळल्यास, त्यावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. जगातील सर्वात मोठं सोशल मीडिया नेटवर्क आपल्या प्लॅटफॉर्मवर अशा कंटेंटचा सामना करण्यासाठी दबावाखाली आहे.

Loading...
Advertisement

फेसबुक याबाबत टेस्टिंग करीत आहे. साईटवर कट्टरता रोखण्यासाठी एका जागतिक दृष्टीकोनातून हे टेस्टिंग सुरू आहे. हे टेस्टिंग फेसबुकवर अशा लोकांचं रिसर्च करीत आहे, जे लोक अतिरेकी कंटेंटशी जोडलेले आहेत किंवा त्यांच्या संपर्कात आहेत किंवा त्यांना एखाद्याला धोका असल्याची जाणीव आहे, अशा लोकांना मदत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement

फेसबुकने हिंसक आणि द्वेषपूर्ण गटांविरुद्ध, द्वेष निर्माण करणाऱ्यांविरुद्ध नियम कठोर केले आहेत. असा कंटेंट पाहणारे, पसरवणाऱ्यांची अकाउंट डिलीट केली जाणार आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेटशेती-मातीच्या बातम्यालेखमाहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलोसबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply