Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

रेंजची मारामार..? मग वाचा की ‘या’ महत्वाच्या टिप्स, पहा होतोय का फायदा..!

Please wait..

आजच्या जमान्यात मोबाइल प्रत्येकासाठीच गरजेचा आहे. त्यामुळे मोबाइल युजर्सची संख्या सातत्याने वाढत आहे. मोबाइल आहे म्हटल्यानंतर त्याची काळजी घेणे आलेच. बऱ्याचदा मोबाइलमध्ये नेटवर्क मिळत नाही, हे आपण नेहमीच ऐकतो. ही समस्या आता खूप सामान्य झाली आहे. कारण, आजकाल प्रत्येकास कधी ना कधी या समस्येचा सामना करावा लागतोच. त्यामुळे मोबाइल सिग्नल कसे मजबूत करता येतील, याचे काही उपाय आहेत, त्याबाबत जाणून घेऊ या…

Advertisement

बऱ्याच वेळा खूप प्रयत्न केल्यानंतर सुद्धा नेटवर्क मिळत नाही. अशा वेळी अगदी सोपा पर्याय म्हणजे फोन रिस्टार्ट करणे. फोन रिस्टार्ट केल्यानंतर नेटवर्क पुन्हा मिळेल. असे बऱ्याच वेळा घडते की फोन रिस्टार्ट केल्यानंतर सुद्धा नेटवर्क मिळत नाही. एखाद्या महत्वाच्या वेळी जर असा प्रकार घडला तर खूप फजिती होते. यासाठी आणखी एक पर्याय आहे. तो म्हणजे, आपल्याला एकदाच मॅन्यूअल नेटवर्क शोधावे लागेल. यासाठी सेटिंग्जमध्ये गेल्यानंतर मोबाइल नेटवर्कचा पर्याय मिळेल. आपण नेटवर्कमध्ये जाऊन ते शोधू शकता.

Advertisement

Advertisement
Loading...

फोनमध्ये नेटवर्क येतच नसेल तर एरअप्लेन मोड उपयुक्त ठरेल. आपण काही सेकंदांसाठी एअरप्लेन मोड सुरू करू शकता. नंतर पुन्हा हा मोड बंद करा. असे केल्याने, डिव्हाइसवर नेटवर्क येणे सुरू होईल. यासाठी फोन स्क्रीन स्वाइप करावी लागेल. येथे एअरप्लेन मोडचा पर्याय दिसेल. काही वेळेस फोन कव्हर देखील सिग्नल ब्लॉक करतात. अशा वेळी नेटवर्क मिळत नसल्याची समस्या येऊ शकते. फोनचे कव्हर जर जाड असेल तर या समस्या उद्भवण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे नेटवर्कच्या प्रॉब्लेम येत असल्यास फोनचे कव्हर एकदा तपासून पहा.

Advertisement

बऱ्याच वेळा 4 जी टॉवर्स उपलब्ध नसताना आपण फोनच्या सेटिंग्स मध्ये जाऊन 2 जी किंवा 3 जी नेटवर्कवर स्विच करायला हवे. अँड्रॉइड फोन असल्यास सेटिंग्जमध्ये गेल्यास कनेक्शनमध्ये मोबाइलचा नेटवर्कचा पर्याय मिळेल. येथून आपण 4 जी नंतर 2 जी किंवा 3 जी नेटवर्कवर स्विच करू शकता. आपण अँड्रॉइड वापरकर्ते असल्यास, नंतर सेटिंग्जमध्ये गेल्यास सेल्युलर पर्याय मिळेल. यानंतर सेल्युलर डेटा पर्यायावर टॅप करणे आवश्यक आहे.

Advertisement

फोनमधील सॉफ्टवेअर कालबाह्य झाले असल्यासही असा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे फोनचे सॉफ्टवेअर अपडेट करायला हवे. नव्या सॉफ्टवेअरचे मेसेज मोबाइल कंपनीकडून मिळत असतातच. आपल्या फोनमध्ये एखादे सॉफ्टवेअर अपडेट आल्यास सॉफ्टवेअर डॉऊनलोड करुन घ्या. जेणेकरुन नेटवर्क समस्या दूर होईल.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply