Technology : भारतात इंटरनेटचा वापर प्रचंड (Internet Use in India) वाढला आहे. भारताची लोकसंख्या, येथील मोठी बाजारपेठ, वेगाने होणारे शहरीकरण, औद्योगिकरण या कारणांमुळे तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. तंत्रज्ञान (Technology) म्हटले की कॉम्प्यूटर आणि मोबाइल पाहिजेच. त्यातही पुन्हा सर्वाधिक स्वस्त डेटा (Internet Data) भारतातच मिळतो. मग काय देशभरात इंटरनेटचा वापर प्रचंड वाढत चालला आहे. नोकिया (Nokia) कंपनीने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालातूनही हीच माहिती समोर आली आहे.
नोकियाच्या एका अहवालानुसार गेल्या पाच वर्षांत देशात मोबाइल डेटा वापरात तीन पटीने वाढ झाली आहे. भारतातील मोबाइल डेटा ट्रॅफिक (Mobile Data Traffic in India) गेल्या पाच वर्षांत ३.२ पटीने वाढला आहे. कारण, संपूर्ण देशातील डेटा वापर २०१८ मध्ये ४.५ एक्साबाइट्स प्रति महिनावरून २०२२ मध्ये १४.४ एक्साबाइट्सपर्यंत वाढला आहे. अहवालात असेही म्हटले आहे की २०२२ मध्ये एक भारतीय व्यक्तीने दरमहा सरासरी १९.५ जीबी डेटा वापर केला.
- Gold Investment साठी ‘हे’ आहेत खास पर्याय; काळजी नको, मिळेल चांगला नफा
- IPL 2023 : सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज कोण ? ; रोहित शर्मा नाही तर..
- IND vs PAK : क्रिकेट चाहत्यांची घोर निराशा; पाकिस्तान संघाने घेतला ‘हा’ निर्णय
- PM-SHRI Scheme : शाळा होणार मॉडेल; ‘त्यासाठी’ मोदी सरकारने 9 हजार शाळा केल्या सिलेक्ट
- PF Balance : कंपनी तुमच्या खात्यात पीएफचे पैसे टाकते का ? ; ‘या’ सोप्या पद्धतींनी मिळवा माहिती
नोकियाने दोन दिवसांपूर्वी आपला वार्षिक मोबाइल ब्रॉडबँड इंडिया ट्रॅफिक इंडेक्स (MBT) अहवाल जारी केला ज्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. नोकियाच्या अहवालात भारतीय मोबाइल बाजाराच्या विकासाबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. यात मोबाइल डेटाचा वापर आणि वाढ, 4G ते 5G कडे चालू असलेले संक्रमण तसेच खासगी नेटवर्कसह 5G चा अवलंब करणे देखील समाविष्ट आहे.
ऑक्टोबर २०२२ मध्ये देशात व्यावसायिक 5G सेवा सुरू झाल्यामुळे मोबाइल डेटा वापरात वाढ झाल्याचे अहवालात नमूद केले आहे. देशातील एकूण मोबाइल डेटा ट्रॅफिकमध्ये 4G आणि 5G ग्राहकांचा वाटा जवळपास १०० टक्के आहे. याव्यतिरिक्त सन २०१८ पासून प्रति वापरकर्ता सरासरी डेटा वापर वेगाने वाढला आहे. २०२२ मध्ये प्रति वापरकर्ता १९.५ गीगाबाइट्स (GB) पर्यंत पोहोचला आहे. २०२२ मध्ये भारतात ७० दशलक्षांपेक्षा जास्त 5G डिव्हाइस भारतीय बाजारपेठेत पाठविण्यात आल्याचा अंदाज लावण्यात आला होता. सन २०२७ पर्यंत खाजगी वायरलेस नेटवर्कमधील भारताची गुंतवणूक २५० दशलक्ष डॉलर्सपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.