मुंबई : प्रसिद्ध पर्यावरणवादी एरिक सोल्हेम यांनी शनिवारी भारत आणि इतर देशांच्या डेटा खर्चाची तुलना करताना सांगितले की, भारतात डेटा खर्च अत्यंत कमी आहे. एरिकने ट्विटद्वारे सांगितले की, भारतात 1 जीबी डेटासाठी फक्त 0.09 डॉलर म्हणजे फक्त 7 रुपये आकारले जातात जे सर्वात कमी डेटा खर्च आहे. याशिवाय, इस्रायलमध्ये 1 GB डेटासाठी 0.11 डॉलर आकारले जाते, जे 8.19 रुपयांच्या समतुल्य आहे. त्याच वेळी अमेरिका आणि कॅनडामध्ये 1 जीबी डेटाची किंमत अनुक्रमे 8 डॉलर (सुमारे 595 रुपये) आणि 12.55 डॉलर (सुमारे 933 रुपये) आहे.
एरिक सोल्हेमने आपल्या ट्विटसह एक इमेज आलेख शेअर केला आहे ज्यामध्ये विविध देशांचा डेटा खर्च सांगितला आहे. इटलीमध्ये डेटासाठी 0.43 डॉलर प्रति जीबी प्रमाणे द्यावे लागतात. ही किंमत 32 रुपये होते. ग्रीसमध्ये 1 GB डेटासाठी 12.06 डॉलर (अंदाजे रु. 897) आकारले जातात, तर दक्षिण कोरियामध्ये 10.94 डॉलर (सुमारे 814 रुपये) आकारले जातात.
एकंदरीत, जरी जगभरात फोनचा वापर वाढत आहे, तरीही डेटाची किंमत देशानुसार मोठ्या प्रमाणात बदलते. सर्वात स्वस्त डेटा किंमत आणि सर्वात जास्त किंमत यामध्ये तब्बल 30 हजार टक्क्यांचा फरक आहे. चला तर मग, जगातील काही देशात 1 GB इंटरनेट डेटासाठी किती पैसे घेतले जातात, हे जाणून घेऊ या..
मलावी या देशात 1 GB डेटासाठी 27.41 डॉलर (अंदाजे रु 2039), बेनिन मध्ये 27.22 डॉलर (अंदाजे 2025 रुपये) चाडमध्ये 23.33 डॉलर (अंदाजे 1736 रुपये), बोत्सवाना – 1 GB डेटासाठी 13.87 डॉलर (अंदाजे 1032 रुपये), येमेन 15.98 डॉलर (अंदाजे 1189 रुपये) आणि बोलिव्हियामध्ये 5 डॉलर (अंदाजे 372 रुपये) आकारले जातात. या देशात फक्त 1 GB डेटासाठी इतके जास्त पैसे द्यावे लागतात. तर भारत 0.09 डॉलर (अंदाजे 7 रुपये), इस्रायल 0.11 डॉलर (अंदाजे 8 रुपये) किर्गिझस्तान 0.21 डॉलर (अंदाजे 15 रुपये) इटली 0.43 डॉलर (अंदाजे 32 रुपये) युक्रेन 0.46 डॉलर (अंदाजे 34 रुपये) आकारले जातात. या देशात 1 GB इंटरनेटचा खर्च अत्यंत कमी आहे.
Ookla च्या स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्सने जारी केलेल्या डेटानुसार, जून 2021 मध्ये भारत निश्चित ब्रॉडबँड स्पीडच्या बाबतीत जगभरात 70 व्या क्रमांकावर होता. Ookla चा स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्स दर महिन्याला जगभरातील इंटरनेट स्पीड डेटाची तुलना करतो. जून 2021 मध्ये भारतात इंटरनेट स्पीडमध्ये वाढ दिसून आली आणि मोबाइल डाउनलोड स्पीडच्या बाबतीत देशाचा तिसरा क्रमांक आणि मोबाइल स्पीडच्या बाबतीत 122 वा तर ब्रॉडबँड स्पीडच्या बाबतीत 70 वा क्रमांक आहे.