मुंबई : देशातील स्मार्टफोन बाजारपेठेत चिनी कंपन्यांचा दबदबा कायम आहे. 2021 च्या चौथ्या तिमाहीत Xiaomi देशातील नंबर 1 स्मार्टफोन ब्रँड बनला. या दरम्यान Xiaomi चा बाजारातील हिस्सा 12 टक्के होता. तर सॅमसंग 19 टक्के मार्केट शेअरसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण तिसर्या क्रमांकावर रियलमीने एन्ट्री घेतली आहे. तर Vivo चौथ्या क्रमांकावर आहे आणि Oppo पाचव्या क्रमांकावर आहे. बाजार विश्लेषक कंपनी कॅनालिसच्या ताज्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.
जर आपण टॉप-5 स्मार्टफोन ब्रँडबद्दल विचार केला, तर 2021 च्या चौथ्या तिमाहीत Realme च्या मार्केट शेअरमध्ये 49 टक्के वाढ झाली आहे. या काळात इतर सर्व टॉप-5 स्मार्टफोन कंपन्यांच्या मार्केट शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. ज्याने Xiaomi आणि Samsung चे टेन्शन वाढले आहे. जर आपण मार्केट शेअरबद्दल सांगितले तर रिअयलमी वगळता Xiaomi ने 22 टक्क्यांनी नुकसान झाले आहे. सॅमसंग 7 टक्के, विवो 27 टक्के, ओप्पो 19 टक्के कमी झाले आहे. तर एकूण स्मार्टफोन मार्केट शेअरमध्ये 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सध्या Xiaomi 21 टक्के, सॅमसंग 19 टक्के, Realme 17 टक्के, Vivo 13 टक्के, Oppo 11 टक्के या प्रमाणे कंपन्यांचा मार्केट शेअर आहे. तसे पाहिले तर Xiaomi कंपनी देशातील नंबर वन कंपनी आहे. पण 2021 मध्ये कंपनीच्या मार्केट शेअरमध्ये 22 टक्के घट झाली आहे. 2021 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा बाजार हिस्सा 21 टक्के होता, जो 2020 च्या चौथ्या तिमाहीत 27 टक्के होता. त्याचप्रमाणे सॅमसंगचा बाजार हिस्सा गेल्या वर्षीच्या तुलनेत 7 टक्क्यांवरून 19 टक्क्यांनी घसरला. तथापि, या कालावधीत, Realme चा बाजार हिस्सा 49 टक्क्यांवरून 12 ते 17 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. रियलमी वगळता विवो आणि ओप्पो कंपन्यांच्या मार्केट शेअरमध्ये घट झाली आहे.
चीनी कंपन्यांना बसणार झटका..! देशात तयार होणार स्वस्त स्मार्टफोन; पहा, सरकारने काय केलेय ?