मुंबई : रिलायन्स जिओ आपल्या जिओ पोस्टपेड प्लस प्लानमध्ये भरपूर डेटा आणि अनेक वैशिष्ट्ये ऑफर करत आहे. जिओचा पोस्टपेड प्लस प्लान 399 रुपयांपासून सुरू होतो आणि 1,499 रुपयांपर्यंत येतो. विशेष म्हणजे, Jio पोस्टपेड प्लस प्लानच्या सर्व प्लानसह, Netflix, Amazon Prime आणि Disney + Hotstar सारख्या लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन मोफत दिले जात आहे. कोरोनाच्या संकटात अनेक कंपन्यांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आधिक इंटरनेट डेटाची आवश्यकता आहे. दरम्यान, जर तुम्हाला आणखी डेटा हवा असेल, तर आज आम्ही तुम्हाला 100 GB डेटा असलेल्या प्लानबद्दल माहिती देणार आहोत.
रिलायन्स जिओच्या 599 रुपयांच्या पोस्टपेड प्लानमध्ये एकूण 100 जीबी डेटा उपलब्ध आहे. त्यानंतर 10 रुपये प्रति जीबी शुल्क लागू होईल. हा एक फॅमिली प्लान आहे, ज्यामध्ये अतिरिक्त सिम कार्ड देखील उपलब्ध आहे. या प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉल उपलब्ध आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस मिळतात.
या प्लानमध्ये 200 GB पर्यंत डेटा रोलओव्हर फिचर देखील उपलब्ध आहे. इतर फायद्यांबद्दल सांगायचे म्हटले तर या प्लानमध्ये सर्व Jio अॅप मोफत प्रवेश उपलब्ध आहे. या प्लानमध्ये Netflix, Amazon Prime आणि Disney + Hotstar VIP चे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. Jio च्या या प्लानमध्ये Netflix, Amazon Prime आणि Disney + Hotstar VIP चे सब्सक्रिप्शन मोफत उपलब्ध आहे. पण JioPrime साठी युजर्सना 99 रुपये वेगळे द्यावे लागतील.
दरम्यान, जिओ लवकरच भारतात 5G नेटवर्क आणणार आहे. Jio पहिल्या टप्प्यात भारतातील 1000 शहरांमध्ये 5G नेटवर्क प्रदान करेल. कंपनी बऱ्याच काळापासून 5G चाचणी करत आहे. जिओचा दावा आहे, की त्यांचा 5G पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहे. Jio कडून त्याच्या 5G नेटवर्कवर हेल्थकेअर आणि औद्योगिक ऑटोमेशनची चाचणी घेतली जात आहे. कंपनी 5G च्या जलद उपयोजनासाठी पायाभूत सुविधांचा वेगाने विस्तार करत आहे. त्या ठिकाणी फायबर आणि विजेची उपलब्धताही वाढ करण्यात येत आहे. जेणेकरून जेव्हा 5G रोलआउटची वेळ येईल तेव्हा त्यात कोणताही व्यत्यय किंवा उशीर होणार नाही.
जिओ 5G नेटवर्क प्रथम त्या भागात आणले जाईल जेथे डेटाचा जास्त वापर आहे. हीट मॅप, 3D नकाशे आणि रे ट्रेसिंग तंत्रज्ञान असे क्षेत्र आणि ग्राहकांना ओळखण्यासाठी कंपनीकडून वापरले जात आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 2021 च्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालांवरून हे उघड झाले आहे. जिओने ग्राहक आधारित 5G सोल्यूशन्स विकसित करण्यासाठी अनेक संघ तयार केले आहेत. जे देशात तसेच अमेरिकेत तैनात आहेत, ते विविध प्रकारचे 5G सोल्यूशन्स विकसित करू शकतात. कंपनीचा विश्वास आहे, की हे संघ 5G सोल्यूशन्स तयार करतील जे तंत्रज्ञानात जगाच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा चांगले असतील. याशिवाय, कंपनीने युरोपमध्ये एक टेक्नॉलॉजी टीम देखील तयार केली आहे जी पुढे 5G साठी तयारी करेल.