Jio Recharge Plan : आज स्मार्टफोनशिवाय पानही हलत नाही. इतका स्मार्टफोन (Jio Recharge Plan) गरजेचा बनला आहे. प्रत्येक कामासाठी फोन पाहिजेच. नुसता फोन असून काय कामाचा तर इंटरनेटही पाहिजेच ना. त्यातही आपल्या देशात इंटरनेट अतिशय स्वस्त. मग काय विचारता भारतीयांकडून इंटरनेटचा वारेमाप वापर सुरू आहे. कंपन्याही भरभरून इंटरनेट उपलब्ध करून देत आहे. आता तर देशात आयपीएल (IPL 2023) स्पर्धा सुरू आहेत. त्यामुळे कंपन्यांनी काही खास प्लान सादर केले आहेत. टेलिकॉम कंपनी जिओने एक दीर्घ वैधता असलेला रिचार्ज प्लान आणला आहे.
वास्तविक कंपनी आपल्या प्रीपेड वापरकर्त्यांसाठी नवीन रिचार्ज योजना ऑफर करत आहे. ज्या वापरकर्त्यांना अधिक दिवस चालणारा रिचार्ज प्लॅन (Prepaid Recharge Plan) हवा आहे त्यांच्यासाठी कंपनी वार्षिक रिचार्ज योजना ऑफर करत आहे.
जिओचा १५५९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
Jio ने आपल्या प्रीपेड वापरकर्त्यांसाठी नवीन वार्षिक रिचार्ज योजना सादर केली आहे. कंपनीने आपल्या वापरकर्त्यांसाठी 1559 रुपयांचा वार्षिक रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. कंपनीकडून युजर्ससाठी हा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन आहे. कंपनी या प्लॅनमध्ये यूजर्सना अनेक फायदे देत आहे. विशेष म्हणजे जिओचे वापरकर्ते अनलिमिटेड कॉल आणि नेटचा लाभ दररोज ५ रुपयांपेक्षा कमी किंमतीत घेऊ शकतात.
वार्षिक रिचार्ज प्लॅनचे फायदे
कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजरला फक्त 24 GB नेटचा फायदा मिळतो. त्यानुसार वापरकर्त्याला दरमहा केवळ 2 GB नेटचा लाभही मिळतो. याशिवाय प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलची सुविधा आहे. जिओचा हा रिचार्ज प्लॅन ३३६ दिवसांच्या वैधतेसह येतो. एवढेच नाही तर Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Cloud सारख्या सुविधांचा लाभ घेऊ शकतो.
या प्लॅनमध्ये मिळत असलेल्या नेटचा विचार केला तर हा प्लॅन तितकासा फायदेशीर ठरत नाही. कारण या प्लॅनमध्ये मिळणारे इंटरनेट अत्यंत कमी आहे. त्यामुळे नेट संपल्यानंतर तुम्हाला जास्तीच्या इंटरनेटसाठी आणखी पैसे खर्च करावे लागणार आहेत. त्यामुळे वर्षभरासाठीचा हा प्लॅन खरेदी करताना आधी विचार करा आणि मग प्लॅन खरेदी करा.