मुंबई : BSNL कंपनीच्या प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज योजनांचा समावेश आहे, ज्यामध्ये युजर्सना अनेक रिचार्ज प्लानचा पर्याय मिळतो. त्यापैकी एक 199 रुपयांचा रिचार्ज प्लान आहे, ज्यामध्ये ग्राहकांना एकाच वेळी अनेक फायदे मिळतात. तथापि, BSNL प्रमाणे, खासगी दूरसंचार कंपन्या Jio आणि Vodafone-Idea देखील 199 रुपयांच्या रिचार्ज प्लानसह येतात. जरी या प्लानची किंमत सारखीच आहे, परंतु फायद्यांच्या बाबतीत 199 रुपयांचे हे तीन रिचार्ज प्लान एकमेकांपेक्षा एकदम वेगळे आहेत. जर आपण तीन रिचार्ज योजनांची तुलना केली तर सरकारी मालकीची टेलिकॉम कंपनी बीएसएनएलची रिचार्ज योजना Jio आणि Vi च्या प्लानवर भारी आहे. या रिचार्ज प्लानबद्दल जाणून घेऊ या.
जिओचा 199 रुपयांचा रिचार्ज प्लान
जिओच्या 199 रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये ग्राहकांना 23 दिवसांपर्यंत वैधता मिळते. प्लानअंतर्गत ग्राहकांना दररोज 1.5 GB हाय-स्पीड डेटा मिळतो. 23 दिवसांच्या वैधतेनुसार या प्लानमध्ये तुम्हाला वापरण्यासाठी एकूण 34.5 GB डेटा मिळतो. याशिवाय या प्लानमध्ये अमर्यादित कॉल आणि दररोज 100 एसएमएस सुविधेचा समावेश आहे.
Vi Rs 199 रिचार्ज प्लान
Vi च्या 199 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना फक्त 18 दिवसांची वैधता मिळते. याशिवाय कंपनी ग्राहकांना वापरासाठी दररोज फक्त 1 GB डेटा प्रदान करते. 18 दिवसांच्या वैधतेनुसार प्लान अंतर्गत ग्राहकांना वापरण्यासाठी एकूण 18 GB डेटा मिळतो. तथापि, तुम्हाला या कंपनीतही Jio प्रमाणे कॉल आणि SMS फायदे मिळतील.
बीएसएनएलचा 199 रुपयांचा रिचार्ज प्लान
BSNL कंपनी 199 रुपयांच्या प्लानमध्ये 30 दिवसांची पूर्ण वैधता ऑफर करते. या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज 2 GB डेटा प्रदान केला जातो. 30 दिवसांच्या वैधतेनुसार वापरकर्त्यांना प्लान अंतर्गत वापरण्यासाठी 60 GB मिळतो. याशिवाय या प्लानमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल आणि दररोज 100 एसएमएस सुविधा देखील आहे.
‘BSNL’ ने खासगी कंपन्यांना दिलीय जोरदार टक्कर..! ‘या’ प्लानमध्ये मिळताहेत जबरदस्त फायदे