मुंबई : काउंटरपॉइंट रिसर्चच्या अहवालानुसार, देशाच्या स्मार्टफोन मार्केटमध्ये 2021 मध्ये तब्बल 16.9 कोटी स्मार्टफोनची सर्वाधिक विक्री झाली आहे. काउंटरपॉईंट रिसर्चच्या मार्केट मॉनिटर सेवेच्या प्राथमिक डेटानुसार 2021 मध्ये देशातील स्मार्टफोन शिपमेंटने 16.9 कोटींचा टप्पा पार केला. याआधी 2020 मध्ये 15.2 कोटी स्मार्टफोन विकले गेले होते. म्हणजेच, फक्त एकाच वर्षात यामध्ये 11 टक्के वाढ झाली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या कोरोना लाटेमुळे तसेच पुरवठ्यातील समस्या आणि काही घटकांच्या कमतरतेमुळे किमतीत वाढ झाली. 5G स्मार्टफोन्सची वाढती मागणी हे यामागे एक महत्वाचे कारण होते, असे अहवालात म्हटले आहे. 2021 मध्ये एकूण शिपमेंटमध्ये 5G स्मार्टफोन्सचा वाटा सुमारे 17 टक्के होता, 2020 च्या तुलनेत 6 पटीने वाढ झाली आहे. OEM मध्ये तीव्र स्पर्धा आणि 5G उपकरणांच्या घसरत्या किमती यामुळे कंपन्या अधिक 5G उपकरणे बाजारात आणू शकतील. गेल्या सहा महिन्यांत एंट्री-लेव्हल 5G उपकरणांच्या किमती 40 टक्क्यांनी घसरल्या आहेत.
ग्राहकांची मागणी 2021 मध्ये प्रीमियम किमतीच्या पातळीवर जास्त राहिली. या किंमत बँडमध्ये शिपमेंट 98 टक्क्यांनी वाढली. 10 हजार रुपयांच्या खाली असलेल्या टप्प्यात 30 टक्के बाजारातील हिस्सा होता. यामध्ये 5 टक्क्यांनी घसरण दिसून आली. तर 10 हजार ते 20 हजार रुपयांचा विभाग (47 टक्के हिस्सा) 8 टक्क्यांनी वाढला. 20 हजार ते 30 हजार रुपयांचा विभाग (13 टक्के) 95 टक्क्यांनी वाढला.
काउंटरपॉईंटने सांगितले ,की किरकोळ सरासरी विक्री किंमतीने देखील जास्त वाढ दर्शविली, 13 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. देशातील स्मार्टफोन बाजार अनेक कंपन्यांचा विकास आणि अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अनेक संधी प्रदान करतो.
दरम्यान, भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये चीनी, तैवानी आणि अमेरिकन टेक कंपन्यांचे वर्चस्व आहे. पण केंद्र सरकारला आता देशातील स्मार्टफोन कंपन्यांना परदेशी कंपन्यांच्या बरोबरीने आणायचे आहे. जेणेकरून स्वस्त स्मार्टफोन देशात तयार करता येतील. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) या दिशेने वेगाने काम करत आहे. MeitY ने सेमी कंडक्टर डिझाइनसाठी सुमारे 100 देशांतर्गत कंपन्यांकडून अर्ज मागवले आहेत. जेणेकरून सेमी कंडक्टर्सची रचना देशात करता येईल.
केंद्र सरकारला देशात सेमी कंडक्टर डिझाइन इको-सिस्टम विकसित करायची आहे. DLI योजनेंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय देशांतर्गत कंपन्या, स्टार्टअप आणि MSME ला फायदा देईल.
चीनी कंपन्यांना बसणार झटका..! देशात तयार होणार स्वस्त स्मार्टफोन; पहा, सरकारने काय केलेय ?