Team India : टीम इंडियाला (Team India) विश्वचषकापूर्वी 22 सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) 3 सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची मानली जात आहे. या मालिकेसाठीचा संघ आज जाहीर होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर आणि प्रसिद्ध कृष्णासारख्या खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते. अय्यर आणि सूर्या यांचाही विश्वचषक संघात समावेश आहे. मात्र दुखापतीमुळे अय्यरला आशिया चषक स्पर्धेत एकच सामना खेळता आला. दुसरीकडे, आशिया चषक स्पर्धेत सूर्यकुमार यादवला मिळालेल्या संधीचे सोने करता आले नाही. त्याचा वनडे रेकॉर्ड काही खास नाही.
माजी दिग्गज पाकिस्तानी क्रिकेटपटू वसीम अक्रम या मालिकेबाबत फारसा उत्सुक नाही. आशिया चषकाच्या फायनलनंतर तो म्हणाला की, टीम इंडिया लयीत आहे. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेला काही अर्थ नाही. त्यामुळे खेळाडूंना दुखापत होण्याची शक्यता आहे. शिवाय त्यांच्या कामाचा ताणही प्रभावित होणार आहे.
वर्ल्डकपमध्येही रोहितच्याच हाती कमान
आशिया कप 2023 विजेतेपद पटकावून टीम इंडियाने (Team India) विश्वचषक 2023 आधी (World Cup 2023) प्रतिस्पर्धी संघांना इशारा दिला आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने आशिया चषकात अंतिम सामन्यात श्रीलंकेचा 10 विकेट्स राखून पराभव केला. अंतिम फेरीत श्रीलंकेचा संघ केवळ 50 धावा करू शकला. प्रत्युत्तरात टीम इंडियाने एकही विकेट न घेता 37 चेंडूत लक्ष्य गाठले. रोहितने कर्णधार म्हणून दुसऱ्यांदा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले. यापूर्वी 2018 मध्येही भारतीय संघाने रोहितच्या नेतृत्वात स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. आशिया चषक स्पर्धेच्या 39 वर्षांच्या इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडियाचे हे एकूण आठवे विजेतेपद आहे.
कर्णधार म्हणून रोहित शर्माचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. अशा स्थितीत टीम इंडियाला 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली अशीच कामगिरी करायची आहे. रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून आतापर्यंत 9 फायनल खेळल्या आहेत आणि त्या सर्व जिंकल्या आहेत. आशिया चषकाच्या 2 विजेतेपदांव्यतिरिक्त यात T20 तिरंगी मालिकेच्या विजेतेपदाचाही समावेश आहे. रोहितने आयपीएलमध्ये (IPL) मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) 5 खिताब मिळवून दिले आहेत. याशिवाय त्याने एकदा कर्णधार म्हणून मुंबईला चॅम्पियन्स लीगमध्ये चॅम्पियन बनवले आहे. भारतीय संघ घरच्या मैदानावर होणाऱ्या विश्वचषकात फेव्हरिट म्हणून प्रवेश करत आहे. या संघाने 2011 मध्ये घरच्या मैदानावर शेवटचे विश्वचषक जिंकले होते. म्हणजेच 12 वर्षांपासून संघ विश्वचषक विजेतेपदाची वाट पाहत आहे.