Team India: टीम इंडियाच्या (Team India) एका खेळाडूची कारकीर्द आता वयाच्या 22 व्या वर्षी संपत असल्याचे दिसत आहे. या खेळाडूकडे निवड समितीचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. प्रत्येक मालिकेत हा खेळाडू टीम इंडियाच्या बाहेर राहतो. आता या खेळाडूने निवडकर्त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
टीम इंडियाच्या या खेळाडूच्या कारकिर्दीवर टांगती तलवार!
टीम इंडियाचा हा खेळाडू दुसरा कोणी नसून धमाकेदार सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi show) आहे. टीम इंडियाला 26 जून आणि 28 जून रोजी आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे, मात्र या मालिकेत पृथ्वी शॉची निवड करण्यात आली नाही.
आता निवडकर्त्यांना सडेतोड उत्तर
पृथ्वी शॉने अलीकडेच रणजी ट्रॉफीच्या पाच सामन्यांमध्ये तीन अर्धशतके झळकावली होती, मात्र तरीही त्याला आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत संधी देण्यात आली नव्हती. पृथ्वी शॉ म्हणाला, ‘मी काही (तीन) अर्धशतके झळकावली आहेत, पण ती माझ्यासाठी नक्कीच पुरेशी नाही आणि अर्धशतक झळकावल्यानंतरही कोणीही माझे अभिनंदन केले नाही असं त्याने सांगितले.
फक्त स्वतःबद्दल विचार करू नका
पृथ्वी शॉ म्हणाला, ‘कधीकधी असं होतं पण माझा संघ चांगली कामगिरी करत आहे याचा मला आनंद आहे. मुंबईचा कर्णधार या नात्याने मला केवळ माझ्याबद्दलच नाही तर माझ्यासोबत आलेल्या सर्व 21 खेळाडूंचा विचार करावा लागेल.
क्रिकेटमध्ये नेहमीच चढ-उतार होत असतात
पृथ्वी म्हणाला, ‘क्रिकेट आणि आयुष्यात नेहमीच चढ-उतार असतात आणि तुम्ही पुढे जात राहता असे कधीच घडत नाही. त्यामुळे मी बॉल्सला चांगले फटके मारणे आणि पुन्हा एकदा मोठी खेळी खेळणे हे फक्त वेळेची बाब आहे, परंतु सध्या मला खात्री करून घ्यायची आहे की माझा संघ चांगला करेल आणि मी सांघिक खेळाचा आनंद घेत आहे.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
अजूनही भारतीय संघात पुनरागमन करण्याचा विचार नाही
त्याला विचारले असता तो राष्ट्रीय संघात परतणे पसंत करत नाही का? पृथ्वी म्हणाला, ‘मी सध्या भारतीय संघात पुनरागमन करण्याचा अजिबात विचार करत नाही. चषक जिंकणे हे माझे मुख्य उद्दिष्ट आहे आणि तो जिंकण्याशिवाय मी इतर कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही.