Team India New Jersey | टीम इंडियाच्या खेळाडूंचा नवा लूक; पहा, T20 च्या नव्या जर्सीत काय खास?

Team India New Jersey for T20 World Cup 2024 : यंदाचा टी 20 विश्वचषक अमेरिका आणि वेस्टइंडिज या (Team India New Jersey) दोन देशांत होणार आहे. जून महिन्यात या स्पर्धा सुरू होतील. यासाठी आयसीसीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. क्रिकेट संघांकडून 15 सदस्यीय संघाची घोषणा होत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही (BCCI)15 सदस्यीय संघाची घोषणा मागील आठवड्यात केली होती. त्यानंतर आता टीम इंडियातील (Team India) खेळाडूंसाठी नवी जर्सी लाँच करण्यात आली आहे.

पुढील महिन्यात T20 विश्वचषक होणार आहे. T20 ची ही सर्वात मोठी लवकरच सुरू होईल. या स्पर्धेचे आयोजन वेस्टइंडिज आणि अमेरिका यांनी संयुक्तपणे केले आहे. भारतीय क्रिकेट संघाने याआधीच 15 खेळाडूंचा संघ निवडला असून त्यात काही आश्चर्यकारक नावांचा समावेश आहे. फलंदाज म्हणून सातत्याने आश्चर्यकारक कामगिरी करणाऱ्या रिंकू सिंगला रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील संघात स्थान मिळालेले नाही, तर शुभमन गिल आणि रवी बिश्नोई सुद्धा संघाबाहेर आहेत.

T20 World Cup 2024 | टीम इंडियाची घोषणा, रोहितच्या हाती कमान, ‘या’ खेळाडूंचा कटला पत्ता

Team India New Jersey

आदिदास कंपनीने आगामी T20 विश्वचषकासाठी भारताची जर्सी लाँच केली आहे. नवीन जर्सीमध्ये बाहीवर तीन भगवे पट्टे आहेत. पुढील आणि मागील भाग निळ्या रंगाचे आहेत. यासोबतच बाजूला भगवा पट्टाही आहे. जर्सी लाँच होण्याआधीच त्याचा फोटो सोशल मीडियावर लीक झाला होता. आता आदिदासनेही जर्सी जारी केली आहे.

प्रत्येक आयसीसी स्पर्धेपूर्वी संघांच्या नवीन जर्सी लाँच केल्या जातात. क्रिकेट चाहते भारताच्या अधिकृत T20 वर्ल्डकप जर्सीची आतुरतेने वाट पाहत होते. Adidas BCCI चा किट प्रायोजक आहे आणि ते ODI आणि T20 साठी वेगवेगळ्या जर्सी बनवतात. ODI जर्सीला कॉलर असून त्यावर वाघाचे पट्टे आहेत.

Team India New Jersey

T20 World Cup | अमेरिका-वेस्टइंडिज सज्ज; दोन्ही संघांची घोषणा, ‘या’ खेळाडूंचा पत्ता कट

टी-20 विश्वचषकात भारतीय संघ अ गटात पाकिस्तानसोबत आहे. अमेरिका, कॅनडा आणि आयर्लंड हेही या गटात आहेत. ५ जून रोजी भारतीय संघ पहिला सामना आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. यानंतर ९ जून रोजी भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. त्यानंतर भारताचा सामना 12 व्या तारखेला अमेरिकेशी आणि 15 तारखेला कॅनडाशी होणार आहे. 26 आणि 27 जून रोजी उपांत्य फेरी तर 29 रोजी अंतिम फेरी होणार आहे.

Leave a Comment