Team India : भारतीय संघाला दोन नवे गोलंदाज मिळणार आहेत. हे दोन्ही खेळाडू भारतीय संघात तीच भूमिका बजावताना दिसणार आहेत जी युवराज सिंग आणि सुरेश रैना मधल्या ओव्हरमध्ये करत असत. टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. आता तुम्हालाही या दोन खेळाडूंची नावे जाणून घेण्यासाठी उत्सुकता असेल, तर हे दोन खेळाडू दुसरे तिसरे कोणी नसून यशस्वी जैस्वाल आणि तिलक वर्मा असतील.
संघाला दोन नवीन अर्धवेळ गोलंदाज मिळणार आहेत
भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील चौथ्या T20 सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना गोलंदाजी प्रशिक्षक म्हणाले की, यशस्वी आणि तिलक यांचाही अर्धवेळ गोलंदाज म्हणून वापर केला जाईल. हे दोन्ही खेळाडू बऱ्याच काळापासून गोलंदाजी करत आहेत. प्रशिक्षक म्हणाले, “तुमच्याकडे हे काम करू शकणारे कुणी असेल तर यापेक्षा चांगली गोष्ट नाही. मी तिलक आणि यशस्वी यांना बऱ्याच दिवसांपासून गोलंदाजी करताना पाहत आहे. ते चांगले गोलंदाज बनण्यास सक्षम आहेत.”
गोलंदाजी प्रशिक्षक पुढे म्हणाले, तिलक वर्मा आणि यशस्वी गोलंदाजी करू शकतात. मला विश्वास आहे की आम्ही त्यांना लवकरच गोलंदाजी करताना पाहू. आम्ही त्याच्यावर काम करत आहोत. या गोष्टीला थोडा वेळ लागेल. लवकरच आम्ही त्याला किमान एक ओव्हर टाकताना पाहू.”
तिलकचा प्रभाव
वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेत तिलक वर्मा आपल्या जबरदस्त फलंदाजी केली आहे. आतापर्यंत झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये तिलकने चांगली फलंदाजी केली. तिलकने 3 सामन्यात 69 च्या अविश्वसनीय सरासरीने आणि 139 च्या स्ट्राईक रेटने 139 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने अर्धशतकही केले.