Team India Head Coach: मोठी बातमी, भारतीय संघात होणार बदल, BCCI ने ‘या’ पदासाठी मागवले अर्ज

Team India Head Coach: पुढील महिन्यापासून टी 20 विश्वचषकाची सुरुवात होणार आहे. मात्र त्यापूर्वी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी बीसीसीआयने इच्छुकाकडून अर्ज मागितले आहे.

टी ट्वेण्टी विश्वचषक 2024 नंतर सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपणार आहे. द्रविड नोव्हेंबर 2021 पासून भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावत आहे.मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड देखील पुन्हा एकदा या पदासाठी अर्ज करु शकतात अशी माहिती बीसीसीआय सचिव जय शाह यांनी दिली होती अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 मे आहे.

बीसीसीआयने जारी केलेल्या जाहिरातीत नवीन मुख्य प्रशिक्षकाचा कार्यकाळ साडेतीन वर्षांचा असेल असे लिहिले आहे. हा कार्यकाळ 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत असेल. अर्ज प्रक्रियेनंतर 1 जुलै 2024 पासून नवीन प्रशिक्षकाची नियुक्ती केली जाईल. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि T20 विश्वचषक 2026 चे आयोजनही याच कार्यकाळात होणार आहे. बीसीसीआयने म्हटले आहे की नवीन प्रशिक्षक निवड प्रक्रियेत अर्जांचे रिव्हू, मुलाखत आणि नंतर निवडलेल्या उमेदवारांचे मूल्यांकन समाविष्ट असेल.

बीसीसीआयनेही काही अटी घातल्या आहेत. मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्जदाराला किमान 30 कसोटी किंवा 50 एकदिवसीय सामने खेळण्याचा अनुभव असावा. किंवा किमान 2 वर्षे कसोटी खेळणारा राष्ट्रीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. याशिवाय, तो किमान 3 वर्षे IPL संघ/सहयोगी सदस्य संघ किंवा अशा कोणत्याही लीग किंवा प्रथम श्रेणी संघ किंवा राष्ट्रीय अ संघाचा प्रशिक्षक असावा.

 अर्जदाराचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असावे.

परदेशी देखील मुख्य प्रशिक्षक होऊ शकतो.

 भारतात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषक 2023 नंतर राहुल द्रविडचा कार्यकाळ संपला होता, जो बोर्डाने जूनपर्यंत वाढवला होता. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी नुकतेच सांगितले होते की द्रविडला पुन्हा अर्ज करायचा असेल तर तो करू शकतो. यासोबतच मुख्य प्रशिक्षक भारतीय असेल याची खात्री आम्ही केलेली नाही, असेही सांगण्यात आले. हे सर्व क्रिकेट सल्लागार समितीच्या निर्णयावर अवलंबून असेल.

Leave a Comment