मुंबई : दक्षिण आफ्रिकेने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकेत पराभव केल्यानंतर टीम इंडियास आणखी एक धक्का बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही संघावर कारवाई केली आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ओव्हर गती कमी ठेवल्यामुळे टीम इंडियाच्या सामना शुल्कातील 40 टक्के रक्कम आयसीसीकडून वसूल केली जाणार आहे. मॅच रेफरी पायक्रॉफ्ट यांनी सांगितले, की निर्धारीत वेळेनुसार भारतीय संघ दोन ओव्हर मागे पडला होता. त्यामुळे संघावर ही कारवाई करण्यात आली आहे.
कसोटी मालिकेत पराभव पत्करावा लागलेला भारतीय संघ एकदिवसीय मालिकेतही बॅकफूटवर दिसला आणि दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकण्याचे स्वप्न यावेळीही पूर्ण करता आले नाही. दुसरा एकदिवसीय सामन्यातही आफ्रिकेने पराभव केला. दोन्ही मालिकांमध्ये निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना आता रविवारी केपटाऊनमध्ये होणार आहे. भारतीय संघास दुसरा सामना जिंकणे अत्यंत महत्वाचे होते. मात्र, या सामन्यातही खेळाडूंनी अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे भारतीय संघाला या सामन्यातही पराभव पत्करावा लागला.
यानंतर आता पुढील महिन्यात वेस्ट इंडिज संघ भारतात येणार आहे. येथे दोन्ही संघां दरम्यान तीन एकदिवसीय आणि तीन टी 20 सामन्यांची मालिका होणार आहे. कोरोनाचा धोका पाहता बीसीसीआयने या मालिकेच्या वेळापत्रकात बदल केला आहे. त्यानुसार, आता एकदिवसीय सामने अहमदाबाद आणि टी 20 सामने कोलकाता या शहरात होणार आहेत. अन्य शहरात आता क्रिकेट सामने होणार नाहीत. आता या सामन्यात भारतीय संघ काय कामगिरी करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दक्षिण आफ्रिकेत भारताचा पराभव : या दोन गोलंदाजांची वनडेमधील कारकीर्द धोक्यात