Tax Saving Tips : आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या ‘या’ योजना, कर बचतीसह होईल लाखोंची कमाई

Tax Saving Tips : जर तुम्ही आयटीआर भरत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण आता तुम्ही कर बचतीसह लाखोंची कमाई करू शकता. कारण अशा काही योजना आहेत ज्यात तुम्हाला भरघोस परतावा मिळेल.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी

आयकर वाचवण्याचा PPF हा एक उत्तम पर्याय आहे. पण हे लक्षात ठेवा की PPF खात्याचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षे आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे गुंतवणूक, व्याज आणि मुदतपूर्तीवर पैसे काढणे यावर कर सवलत उपलब्ध आहे.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र 

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही कर बचत योजना म्हणून लोकप्रिय आहे. या योजनेचा परिपक्वता कालावधी पाच वर्षांचा आहे. यात 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांच्या कर लाभाचा लाभ मिळतो. पण याच्या व्याजावर कर भरावा लागतो. सुरुवातीच्या वर्षांतील व्याज हे NSC मधील गुंतवणूक म्हणून मानले जाते. तुम्हाला 80C अंतर्गत त्यावर कर सवलत मिळेल.

बँक एफडी

मुदत ठेव ही गुंतवणुकीची सर्वात सुरक्षित पद्धत मानली जात असून यात तुमची गुंतवलेली रक्कम केवळ सुरक्षितच राहते असे नाही तर त्यावर तुम्हाला निश्चित परतावा मिळतो. पाच वर्षांच्या एफडीला आयकर बचत मुदत ठेव असे म्हणतात. तुम्हाला पाच वर्षापूर्वी केलेली गुंतवणूक रिडीम करता येत नाही. गुंतवणुकीची रोखी करणे आवश्यक असेल तर तुम्हाला एफडीवरील कर लाभ समायोजित करावे लागतील.

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम 

ELSS मध्येही, तुम्ही 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कपातीचा दावा करता येते. ELSS ची समस्या अशी आहे की त्याचा लॉक-इन कालावधी तीन वर्षांचा आहे. याचा अर्थ तुम्हाला रक्कम तीन वर्षापूर्वी काढता येत नाही. युनिट विकून झालेल्या नफ्यावर आयकर भरावा लागत नाही. लाभांश करमुक्त राहतो. तुम्ही यामध्ये एकरकमी किंवा SIP द्वारे गुंतवणूक करता येते.

युनिट लिंक्ड विमा योजना

ULIP मध्ये, तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत संपूर्ण प्रीमियम रकमेवर कर सवलत मिळते. हे जीवन विमा पॉलिसी आणि गुंतवणूक यांचे संयोजन असून यात तुमच्या प्रीमियमचा एक भाग जीवन विमा संरक्षणासाठी जातो, तर उरलेला भाग परताव्यासाठी निधीमध्ये गुंतवला जातो. ULIP मध्ये, संपूर्ण प्रीमियम रक्कम 80C अंतर्गत करमुक्त आहे.

Leave a Comment