Tax Saving Option । कर वाचवायचा असेल तर तुमच्यासाठी हा आहे उत्तम पर्याय, पहा यादी

Tax Saving Option । अनेकजण गुंतवणूक करत असतात. पण काही योजना अशा आहेत, ज्यात तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला कर भरावा लागतो. काही योजना अशा आहेत ज्यात तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही. पहा त्यांची यादी.

इक्विटी लिंक्ड बचत योजना

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ELSS) मध्ये तुम्हाला 1 वर्षात 1 लाख रुपयांपर्यंतची करमुक्ती करता येईल. त्यावर कॅपिटल गेन टॅक्स लावला जातो. 10 टक्के कॅपिटल गेन टॅक्स लागू आहे.

लाइफ इन्शुरन्स पॉलिसी

लाइफ इन्शुरन्स पॉलिसींमध्येही कर सवलत मिळते. यात तुम्ही 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलत घेऊ शकता.

राष्ट्रीय पेन्शन प्रणाली

नॅशनल पेन्शन सिस्टम ही एक स्वयंसेवक योजना असून या योजनेत तुम्हाला प्राप्तिकर कायद्याच्या 80CCD (1B) अंतर्गत 50,000 रुपयांपर्यंत कर सवलत मिळेल.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) 6.8 टक्के व्याज देत असून या योजनेत कोणताही धोका नाही. या योजनेत तुम्हाला 1 आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयांची कर कपात करता येईल.

एफडी

5 वर्षांच्या कालावधीसह FD मध्ये, तुम्हाला आयकर कायद्याच्या 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांचा कर लाभ घेता येईल. एफडीवर ७ ते ८ टक्के व्याज देण्यात येत असून FD वर मिळणारे व्याज करपात्र आहे.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) च्या गुंतवणूकदारांना करात सवलत मिळते. यासाठी लॉक इन कालावधी संपला पाहिजे. हे लक्षात घ्या की लॉक-इन कालावधी 15 वर्षे असून पीपीएफमध्ये मिळणाऱ्या व्याजावर कोणताही कर नसतो.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीद्वारे कर वाचवता येतो. तुम्ही 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतचा कर लाभ घेऊ शकता.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूकदारांना कर सवलतीचा लाभ मिळत असून हा लाभ ६० वर्षांवरील गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध आहे.

सुकन्या समृद्धी योजना

मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. ही एक करमुक्त योजना असून त्याच्या व्याजावर कोणताही कर नाही.

Leave a Comment