Tax Saving : नोकरदारांनो, करसवलत करायचीय? करा हे काम; होईल हजारोंची बचत

Tax Saving : कर वाचावा म्हणून बँका आपल्या ग्राहकांना टॅक्स सेव्हर एफडीचा पर्याय देत असून अशा प्रकारच्या एफडींचा कालावधी हा पाच वर्षांचा असतो. या योजनेत ग्राहकांना 7 ते 8 टक्क्यांनी रिटर्न्स देखील मिळतात.

NPS

नॅशनल पेन्शन सिस्टम ही सरकारी सेवानिवृत्ती बचत योजना असू यात आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत गुंतवणुकीवर कर सूट मिळते. तुम्ही कलम 80CCD (1B) अंतर्गत वार्षिक 1.5 लाख रुपये आणि अतिरिक्त 50 हजार रुपये गुंतवू शकता. यात गुंतवणूक करून, तुम्ही प्राप्तिकरात एकूण 2 लाख रुपयांची सवलत मिळेल. सरकार एनपीएसलाही प्रोत्साहन देत असून तुम्ही 1000 रुपये प्रत्येक महिन्याला गुंतवणुकीला सुरुवात करू शकता. 18 ते 65 वर्षे वयाच्या कोणत्याही भारतीय नागरिकाला या योजनेत खाते चालू करता येते.

सुकन्या समृद्धी योजना

आता तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करून कर बचत करू शकता, : मुलींसाठी सरकारद्वारे चालवली जाणारी ही एक छोटी बचत योजना. तुम्ही तुमच्या 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावावर सुकन्या समृद्धी योजनेमध्ये खाते उघडून कर वाचवू शकता. योजनेत वार्षिक कमाल 1.5 लाख रुपये जमा करता येऊन आयकर सूट मिळते. सरकारने व्याजदरांमध्ये सुधारणा केली असून या योजनेवरील व्याज 8.2 टक्के केले आहे.

SCSS

ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही एक अतिशय लोकप्रिय बचत योजना असून या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही तुमचे खाते बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये चालू करू शकता. यात केलेल्या गुंतवणुकीद्वारे तुम्ही खात्यात जमा केलेल्या रकमेवर 80C अंतर्गत आयकर सवलत मिळेल. यामध्ये तुम्ही वार्षिक जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. सुकन्या समृद्धी योजनेप्रमाणेच सरकारने व्याजदरात बदल करून ते ८.२ टक्के इतके केले आहेत.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी हा दीर्घकालीन गुंतवणुक पर्याय असून भारतातील सर्वात लोकप्रिय कर बचत योजना म्हणून लोकप्रिय आहे. PPF वर ७.१ टक्के दराने व्याज मिळत असून तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, तुम्हाला पीपीएफमध्ये वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळेल.

Leave a Comment