Tax on Interest Income : महत्त्वाची बातमी! बचत खातेधारकांना भरावा लागणार ‘इतका’ कर, जाणून घ्या नियम

Tax on Interest Income : जर तुमचे बचत खाते असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता तुम्हालाही कर भरावा लागणार आहे. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल. जाणून घ्या आयकराचे नियम.

बचत खाते व्याज कर

आयकर कायद्याच्या कलम 80TTA अंतर्गत, एका आर्थिक वर्षात बचत खात्यातून मिळणारे 10,000 रुपयांपर्यंतचे व्याज करमुक्त असून कपातीची मर्यादा प्रत्येक बँक खात्यासाठी वेगळी नाही. पण सर्व बचत खात्यांमधून मिळालेल्या व्याजाच्या रकमेचा समावेश आहे. ही वजावट ६० वर्षांखालील लोकांसाठी आणि HUF म्हणजेच हिंदू अविभक्त कुटुंबासाठी असून जर बचत खात्यावरील व्याज 10,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर 10,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेवर कर आकारण्यात येईल.

करदात्याला सर्व बचत खात्यांमधून मिळालेल्या व्याजाची रक्कम आयटीआरमध्ये ‘इतर स्त्रोतांकडून मिळणाऱ्या उत्पन्नात’ दाखवावी लागणार आहे. तसेच व्याजाची रक्कम तुमच्या एकूण उत्पन्नात जोडण्यात येईल. हे लक्षात घ्या की टॅक्स स्लॅबनुसार तुम्हाला कर भरावा लागेल.

FD वर कर

मुदत ठेवींमधून मिळणारे व्याज म्हणजेच FD हे व्यक्तींसाठी म्हणजे सामान्य लोकांसाठी म्हणजे पूर्णपणे कराच्या कक्षेत असून ज्येष्ठ नागरिक म्हणजेच 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक बचत खाते आणि FD मधून मिळणाऱ्या व्याजावर 50,000 रुपयांपर्यंतच्या कपातीचा दावा करतात. कपातीचा लाभ घेण्यासाठी, ITR मध्ये व्याज दाखवावे लागणार. कलम 80TTB अंतर्गत वजावट घेतली जाऊन 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना 80TTB चा लाभ मिळत नाही.

FD व्याज एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त असेल तर बँका 10 टक्के दराने TDS कापतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी मर्यादा 50,000 रुपये तर गैर-ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजेच 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी ही मर्यादा 40,000 रुपये इतकी आहे. व्याजासह तुमचे एकूण उत्पन्न मूळ सूट मर्यादेपेक्षा कमी असेल तर तुम्ही फॉर्म 15G/15H भरून TDS कापला जाण्यापासून रोखू शकता.

तसेच जुन्या कर प्रणालीमध्ये, 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या करदात्यांची मूळ सूट मर्यादा 2.5 लाख रुपये तर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा ३ लाख रुपये आहे. अति ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे ८० वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसाठी ही मर्यादा ५ लाख रुपये आहे. आर्थिक वर्ष 2023-24 पासून नवीन कर प्रणालीमध्ये मूळ सूट मर्यादा 3 लाख रुपये इतकी आहे.

लहान बचत योजनेच्या व्याजावर कर

आवर्ती ठेवी जसे की RD, किसान विकास पत्र आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट यांसारख्या लहान बचत योजनेतून मिळालेल्या व्याजावरही कर आकारण्यात येतो. व्याजाची रक्कम तुमच्या कमाईमध्ये जोडण्यात येईल. तुम्ही ज्या उत्पन्नाच्या स्लॅबमध्ये येत आहात त्यानुसार तुम्हाला कर भरावा लागणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांमध्ये ज्येष्ठ नागरिक बचत योजना खूप लोकप्रिय असून यात गुंतवणूक केली तर नियमित अंतराने व्याज मिळेल. या योजनेत मिळणाऱ्या व्याजावरही कर आकारण्यात येईल. जर व्याजासह एकूण उत्पन्न मूळ सूट मर्यादेपेक्षा कमी असल्यास कर लागणार नाही.

Leave a Comment