Tata Tiago EV : आज देशातील बाजारपेठेमध्ये इलेक्ट्रिक कार्सना मोठी मागणी पाहायला मिळत आहे. देशातील बाजारात आज टाटा मोटर्स दमदार रेंजसह एकापेक्षा एक इलेक्ट्रिक कार्स लॉन्च करत आहे.
यातच जर तुम्ही देखील कमी किमतीमध्ये जास्त रेंज देणारी नवीन इलेक्ट्रिक कार खरेदीचा प्लॅन करत असाल तर आम्ही आज तुम्हाला एका जबरदस्त इलेक्ट्रिक कारबद्दल माहिती देणार आहोत ज्याचा तुम्ही फायदा घेत तुमच्यासाठी एक दमदार कार खरेदी करू शकता.
तुमच्या माहितीसाठी जाणुन घ्या आम्ही या लेखात आज तुम्हाला Tata Tiago EV बद्दल माहिती देणार आहोत. बाजारात Tata Tiago EV चक्क Maruti – Hyundai च्या कार्स फेल झाले आहे. याचा मुख्य कारण म्हणजे Tata Tiago EV मध्ये कंपनीने एक शक्तिशाली बॅटरी पॅक दिला आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो Tata Tiago EV ग्राहकांना दोन बॅटरी पॅक पर्याय ऑफर करत आहे, त्यापैकी पहिल्यामध्ये 19.2kWh आणि 24kWh बॅटरी पॅकचा समावेश आहे. लहान बॅटरी पॅक मॉडेल 61 bhp पॉवर आणि 110 Nm टॉर्क निर्माण करते, तर मोठे बॅटरी पॅक मॉडेल 75 bhp पॉवर आणि 114 Nm टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की Tiago EV बेस मॉडेलची रेंज 250km आहे आणि टॉप मॉडेलची रेंज 315km आहे.
Tata Tiago EV फीचर्स
Tata Tiago EV च्या फीचर्सबद्दल सांगायचे तर, यात Android Auto आणि Apple CarPlay सह 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 4-स्पीकर हरमन साउंड सिस्टम 4 ट्वीटर आणि ऑटो एसी, रेन-सेन्सिंग वायपर्स, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स आणि क्रूझ कंट्रोल सारखी फीचर्स देखील आहेत.
तर सेफ्टीसाठी Tata Tiago EV मध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), EBD सह ABS आणि रियर-व्ह्यू कॅमेरा यासारख्या सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहे.
Tata Tiago EV किंमत
Tata Tiago EV बाजारात कंपनीची सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक कार. Tata Tiago EV ची किंमत रु. 8.69 लाखापासून सुरू होते आणि रु. 12.04 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.