Tata Sierra EV : शानदार फीचर्स आणि 500 किमी रेंजसह लाँच होणार Tata ची नवीन EV कार, जाणून घ्या किंमत

Tata Sierra EV : टाटाच्या सर्व कार्सना भारतीय बाजारात चांगली मागणी आहे. कंपनीची अशीच एक इलेक्ट्रिक कार बाजारात लाँच केली जाणार आहे. कंपनीच्या या कारमध्ये तुम्हाला शानदार फीचर्स आणि 500 किमी रेंज मिळेल.

हे लक्षात घ्या की कंपनीने ऑटो एक्स्पो २०२० मध्ये सिएरा ईव्ही ही संकल्पना स्वरूपात दाखवली असून त्यानंतर दुसरी संकल्पना ऑटो एक्स्पो 2023 मध्ये दर्शविली. Tata Sierra EV कोणत्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज होणार असून ती 2026 मध्ये कधी लॉन्च होईल.

Tata Sierra EV चे फीचर्स

महत्त्वाचे म्हणजे Tata Sierra EV मध्ये, मागची सीट काढून सीट वाढवण्याचा पर्याय असेल. ही कार ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम आणि हिल होल्ड असिस्टसह येईल. इतकेच नाही तर यात टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, पुश स्टार्ट आणि स्टॉप बटण, क्रूझ कंट्रोल, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, चार्जिंग पॉइंट समोर आणि मस्क्यूलर लूक असणार आहे. तसेच ड्रायव्हर केबिनमध्ये आणि मागील बाजूस एअरबॅग्ज बसवल्या जाणार आहेत.

जाणून घ्या रेंज

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीची सिएरा ईव्हीची लांबी 4150 मिमी, रुंदी 1,820 मिमी आणि उंची 1675 मिमी असणार आहे. या कारचा लांब व्हीलबेस 2450 मिमी असेल. ही कार एकदा चार्ज केली तर तुम्हाला ती 500 किमी चालवता येईल. ही नवीन जीवनशैली SUV नवीन पंच EV च्या नवीन Acti.ev प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. Sierra EV मध्ये 90 च्या दशकातील सिएराची झलक असू शकते.

किंमत

मीडिया रिपोर्ट्सनुसार लाँच बाबत बोलायचे झाले तर नवीन Tata Sierra EV मार्च 2026 पर्यंत लॉन्च होईल. तुम्हाला यात पाच आणि सात सीटचे पर्याय मिळू शकतात. तसेच या कारची सुरुवातीची किंमत 25 ते 30 लाख रुपये असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

Leave a Comment