Tata Punch EV: भारतीय ऑटो बाजारात येत्या काही दिवसात टाटा मोटर्स आपली लोकप्रिय SUV कार Tata Punch इलेक्ट्रिक अवतारात लॉन्च करणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या कारमध्ये कंपनी शक्तिशाली बॅटरी पॅकसह दमदार रेंज ऑफर करणार आहे. काही दिवसापूर्वी ही कार टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार या कारमध्ये जवळपास 200 ते 300 किमीची रेंज मिळणार आहे.
Tata Punch EV
या कारमध्ये सिंक्रोनस मोटर आणि लिक्विड-कूल्ड बॅटरी दिसेल. यासोबतच तुम्हाला या कारमध्ये 24 kW ची मोटर पाहायला मिळेल. ही मोटर 74 Bhp कमाल पॉवर निर्माण करण्यास सक्षम आहे.
Tata Punch EV फीचर्स
कंपनीने या कारमध्ये नवीन 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 7.0-इंच युनिट, हॅप्टिक टच कंट्रोल्स, टू-स्पोक स्टीयरिंग व्हील, 360-डिग्री कॅमेरे, डिजिटल इन्फोटेनमेंट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एअरबॅग्ज दिल्या आहेत. या कारमध्ये ABS सोबत EBD सारखे अनेक ॲडव्हान्स फीचर्स देखील पाहायला मिळतील.
Tata Punch EV किंमत
सध्या कंपनीने या कारच्या किंमतीबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. पण असा अंदाज वर्तवला जात आहे की कंपनी ही कार 10 लाख रुपयांपर्यंतच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीत बाजारात आणू शकते.
यासोबतच ही कार लॉन्च झाल्यानंतर ह्युंदाई एक्स्टर ईव्ही सारख्या कार्सना थेट टक्कर देणार आहे.