Tata Nexon Sale । टाटाच्या सर्वच कार्सना बाजारात चांगली मागणी आहे. कंपनीदेखील आपल्या कारवर चांगलं डिस्काउंट देत असते. सध्या अशीच एक ऑफर कंपनीने आणली आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
Tata Nexon बाजारात एकूण 11 प्रकार ऑफर करत असून कंपनी आता त्याच्या बेस व्हेरिएंट Smart वर Rs 16000 पर्यंत आणि Creative+ S वर Rs 1 लाख पर्यंत सवलत देत आहे. यात रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सवलतीचा समावेश आहे. Nexon चे इलेक्ट्रिक व्हर्जन आहे. इतकेच नाही तर कंपनी लवकरच या कारचे CNG व्हर्जन आणणार असून ऑफर 31 जुलै 2024 पर्यंत लागू आहे.
मिळेल शक्तिशाली इंजिन
ही कार 1497 cc चे शक्तिशाली इंजिनसह येत असून उच्च पिकअपसाठी, हे इंजिन 120hp पॉवर आणि 170Nm चा पीक टॉर्क मिळेल. कंपनीच्या कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ट्रान्समिशन मिळेल. ही कार मागील बाजूस एलईडी हेडलॅम्प आणि डिझायनर टेललाइट बारसह येत असून 180 किमी प्रतितास वेग असलेली ही हायस्पीड कार आहे. सुरक्षेसाठी कारला सहा एअरबॅग आणि 360 डिग्री कॅमेरा मिळेल. किमतीचा विचार केला तर या कारचे बेस मॉडेल 9.63 लाख रुपये ऑन रोड ऑफर केले जात आहे.
टाटा नेक्सॉन फीचर्स
- कारला अलॉय व्हील मिळत असून जे तिचा लूक वाढवतात.
- कारमध्ये 10.25 इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट आहे.
- ही कार 2-स्पोक मल्टी फंक्शनल स्टीयरिंग व्हील मिळेल.
- टाटाच्या या कारमध्ये 16 इंची अलॉय व्हील मिळेल.
Maruti Vitara Brezza ऑफर
Tata Nexon बाजारात मारुती ब्रेझा, Hyundai Venue, Kia Sonet, Renault Kiger, Mahindra XUV300 आणि Nissan Magnite सारख्या वाहनांशी टक्कर देते. कंपनी Maruti Brezza वर 25000 रुपयांपर्यंत सवलत देत असून ऑफर 31 जुलै 2024 पर्यंत लागू आहे. मारुती ब्रेझामध्ये 1462 cc उच्च पॉवर इंजिन असून या कारमध्ये ड्युअल टोन आणि मागील सीटवर चाइल्ड अँकरेज सारखी सेफ्टी फीचर्स दिली आहेत. यात एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प दिला आहे. ड्युअल कलर पर्याय उपलब्ध आहेत. कारच्या टॉप मॉडेलवर सनरूफ दिले आहे. ही कार पेट्रोल इंजिनवर 19.05 kmpl चा उच्च मायलेज जनरेट करते.
या कारमध्ये सहा रंगांचे पर्याय आणि सीएनजी इंजिन उपलब्ध असून कार सीट बेल्ट रिमाइंडर, हाय स्पीड अलर्टसह येते. कंपनीच्या या कारमध्ये LED प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि मागील सीटवर एसी व्हेंट्स आहेत.हे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते.