Tata Nexon : सोडू नका संधी! Tata Nexon वर मिळत आहे 1 लाखांपर्यंत सवलत, पहा ऑफर

Tata Nexon : जर तुम्ही नवीन कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Tata Nexon वर 1 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. कोणत्या व्हेरिएंटवर किती डिस्काउंट मिळतो? जाणून घ्या.

टाटा नेक्सॉनची फीचर्स

Nexon मध्ये कंपनीकडून 1.2-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 120 PS आणि 170 Nm टॉर्क जनरेट करते. इतकेच नाही तर 1.5-लीटर टर्बो डिझेल इंजिन आहे जे 115 PS आणि 260 Nm टॉर्क जनरेट करते. हे दोन्ही इंजिन 6-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येतात. तर पेट्रोल इंजिन 7-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक किंवा 5-स्पीड मॅन्युअलसह देखील येते.

टाटा नेक्सॉन इंटीरियर

टाटा नेक्सॉनच्या इंटीरियरबद्दल सांगायचे झाले तर, कारच्या केबिनची रचना नवीन पद्धतीने केली आहे. कारमध्ये टचस्क्रीन सेट-अप, टू-स्पोक स्टीयरिंग आणि कर्व्ह कॉन्सेप्ट इंटीरियर दिले आहे. डॅशबोर्डवर कमी बटणे दिली आहेत. यात फ्री-स्टँडिंग 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि दुसरी स्क्रीन म्हणून 10.25-इंच फुल-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिले आहे, जे नेव्हिगेशनसाठी कस्टमाइझ केले जाईल.

कोणत्या प्रकारावर मिळत आहे सवलत ?

टाटा कंपनी नेक्सॉनच्या 7 व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांच्या जवळपास सर्व प्रकारांवर भरघोस सवलत देत आहे. Nexon स्मार्ट पेट्रोलवर Rs 16,000 आणि Smart+ वर Rs 20,000 ची सवलत देत असून ते आपल्या शुद्ध पेट्रोल आणि डिझेलवर 30,000 रुपयांची सूट देत आहे.

Nexon च्या Smart+S पेट्रोल आणि Pure S पेट्रोलवर 40 हजार रुपयांची सवलत मिळेल. क्रिएटिव्ह पेट्रोल/डिझेल, फेअरलेस पेट्रोल/डिझेल, फेअरलेस एस पेट्रोल/डिझेल, फेअरलेस + पेट्रोल/डिझेल आणि फेअरलेस + एस पेट्रोल/डिझेलवर 60 हजार रुपयांची सवलत मिळेल. इतकंच नाही तर क्रिएटिव्ह + पेट्रोल/डिझेलवर 80,000 रुपयांची शानदार सवलत दिली जात आहे. क्रिएटिव्ह + एस पेट्रोल/डिझेलवर सर्वात जास्त सवलत उपलब्ध आहे, जी 1 लाख रुपये आहे.

Leave a Comment