Tata Nexon EV : Tata Motors ची मोठी घोषणा, ‘या’ इलेक्ट्रिक कारवर मिळणार तब्बल 3 लाख रुपयांपेक्षा जास्त सूट

Tata Nexon EV  : भारतीय बाजारातील ऑटो कंपनी टाटा मोटर्सने एक मोठी घोषणा करत इलेक्ट्रिक कारवर तब्बल 3 लाखांची सूट जाहीर केली आहे. सध्या बाजारात इलेक्ट्रिक कारची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. याचा फायदा घेत कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही सूट जाहीर केली आहे.

जर तुम्ही देखील नवीन इलेक्टिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक सर्वात मोठी संधी आहे. चला मग जाणून घेऊया टाटा मोटर्स कोणत्या कार्सवर किती सूट देत आहे.

Pre-facelift Tata Nexon EV

कंपनी प्री-फेसलिफ्ट इलेक्ट्रिक SUV च्या न विकल्या गेलेल्या युनिट्सवर बंपर सूट देत आहे. कंपनीकडून  Nexon EV Prime वर 2.30 लाख रुपयांच्या रोख सूटसह 50,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळत आहे. त्याच वेळी, Nexon EV Max वर 2.65 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख सवलत आणि 50,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे.

शरद पवारांना धक्का! रोहित पवारांवर ‘त्या’ प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; साखर कारखाना जप्त

Tata Nexon EV

तर कंपनी Tata Nexon EV च्या सर्व व्हेरियंटवर देखील बंपर सूट देत आहे. कंपनी 50,000 रुपयांचा ग्रीन बोनस आणि 2024 मॉडेलवर 20,000 रुपयांचा ग्रीन बोनस देत आहे. मात्र हे जाणून घ्या कि, फेसलिफ्ट केलेल्या मॉडेलवर रोख सवलत किंवा एक्सचेंज बोनस नाही.

Tata Taigo EV

कंपनीच्या सर्वात जास्त विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक कार्सपैकी एक असणारी इलेक्ट्रिक कार Tata Taigo EV देखील बंपर सूट मिळत आहे. कंपनी Tiago EV चे MY2023 युनिट 65,000 पर्यंत डिस्काउंट देत आहे. ज्यामध्ये 50,000 रुपयांचा ग्रीन बोनस आणि 15,000 रुपयांच्या एक्सचेंजचा समावेश आहे. तर MY 2024 मॉडेलवर 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 10,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर कंपनीकडून देण्यात येत आहे.

‘या’ पक्षाकडून नाना पाटेकर लढणार लोकसभा निवडणूक, गोविंदा, राज बब्बर यांना काँग्रेस देणार संधी?

Tata Tiago EV

जर तुम्ही Tata Tiago EV खरेदीचा विचार करत असाल तर Tata Tiago EV वर देखील बंपर सूट उपलब्ध आहे. या कारवर तुम्हाला  1.05 लाखांपर्यंत सूट मिळणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला 75,000 ची रोख सवलत आणि सर्व व्हेरियंटवर 30,000 चे एक्सचेंज बोनसचा फायदा मिळणार आहे. मात्र हे लक्षात ठेवा कि, या कार ही ऑफर फक्त 2023 मध्ये उत्पादित केलेल्या मॉडेल्सवर उपलब्ध आहे.

Leave a Comment