Tata Harrier EV । टाटाची नवीन SUV, जबरदस्त मायलेजसह मिळतील Audi सारखे लक्झरी फीचर्स; जाणून घ्या किंमत

Tata Harrier EV । भारतीय बाजारात लवकरच टाटा आपली नवीन Tata Harrier EV लाँच करणार आहे. कंपनी अनेक दिवसांपासून या कारवर काम करत होती. यात तुम्हाला Audi सारखे लक्झरी फीचर्स पाहायला मिळतील.

हे लक्षात घ्या की Tata Harrier EV लवकरच बाजारात येणाऱ्या मारुती eVX आणि Mahindra XUV.e8 ला टक्कर देईल. ही दोन्ही उच्च श्रेणीची इलेक्ट्रिक वाहने आहेत, ज्यात प्रगत सेफ्टी फीचर्स दिली आहेत.

Tata Harrier EV

ही एक मोठ्या आकाराची लक्झरी कार असून ती खास नवीन पिढीसाठी तयार केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या मस्त कारला 60 kWh बॅटरी पॅक मिळेल, ज्यामुळे एका चार्जवर 500 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज निर्माण करण्यात मदत होईल. सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या Harrier ला Bharat NCAP क्रॅश चाचणीमध्ये 5 स्टार रेटिंग मिळाले आहे.

या कारमध्ये 19 इंच अलॉय व्हील आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दिले जाणार आहे. ही 4 व्हील ड्राइव्ह कार असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे सध्या कंपनीने डिलिव्हरीची तारीख आणि किंमत जाहीर केली नाही. असा अंदाज आहे की ही कार नोव्हेंबर 2024 मध्ये लॉन्च होईल. तिचे बेस मॉडेल 30 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये ऑफर केली जाईल.

Harrier EV चे फीचर्स

  • कारच्या पुढील भागात चार्जिंग पॉइंट आहे, ही कार जलद चार्जिंगला सपोर्ट करेल.
  • कारमध्ये सुरक्षेसाठी सात एअरबॅग्ज आणि ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम पाहायला मिळेल.
  • बाहेरचे चांगले दृश्य पाहण्यासाठी एसयूव्हीला पॅनोरॅमिक सनरूफ देण्यात येईल.
  • या कारमध्ये 12.3-इंचाची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम मिळेल.
  • टाटाच्या या कारमध्ये हवेशीर फ्रंट सीट आणि क्रूझ कंट्रोल असणार आहे.
  • कारमध्ये डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल सिस्टम असेल.

Leave a Comment