Tata Curvv । पुढच्या महिन्यात लॉन्च होणार टाटाची 500 किमी रेंज असणारी ‘ही’ कार, हाय क्लास फीचर्ससह जाणून घ्या किंमत

Tata Curvv । भारतीय बाजारात पुढच्या महिन्यात टाटाची 500 किमी रेंज असणारी कार लाँच होणार आहे. या टाटा कारमध्ये 360-डिग्री कॅमेरा, रियर पार्किंग सेन्सर यांसारखे शानदार फीचर्स मिळेल.

कंपनीने ही नवीन जनरेशन कार 7 ऑगस्ट रोजी लॉन्च करण्याची घोषणा केली असून ही कार MG ZS EV शी त्याच्या किमतीच्या विभागात टक्कर देईल. जर तुम्हाला कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय असेल.

Tata Curvv ला मिळेल हाय स्पीड

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन एकदा पूर्णपणे चार्ज केले तर सुमारे 500 किमी चालेल. या टाटा कारमध्ये 360-डिग्री कॅमेरा, रियर पार्किंग सेन्सर आणि प्रगत ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टीम यासारखी सेफ्टी फीचर्स असतील. कारला हाय क्लास इंटिरियर दिला आहे.

तर यात 12.3 इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे.कारचा पुढचा लूक मस्क्युलर असून मागच्या सीटवर डोक्याची जागा आणि पायाची जागा आरामदायक आहे. सध्या कंपनीकडून कारची किंमत जाहीर करण्यात आल्या नाही. किमतीचा विचार केला तर ही कार 15 ते 20 लाख रुपयांच्या एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किंमतीत ऑफर केली जाऊ शकते.

जाणून घ्या Tata Curvv चे फीचर्स

  • कारला हिल होल्ड असिस्ट आहे, जे कारला उतारावर मागे सरकण्यापासून प्रतिबंधित करते.
  • या कारमध्ये पॅनोरामिक सनरूफ दिला आहे.
  • या कारमध्ये सुरक्षेसाठी सहा एअरबॅग्ज आणि अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टिम असणार आहे.
  • टाटाची ही कार ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध असणार आहे.
  • कारला टू-स्पोक स्टीयरिंग व्हील आणि एलईडी हेडलाइट्स दिले आहेत.
  • या कारमध्ये ऑटो एसी आणि मागील सीटवर चाइल्ड अँकरेज असणार आहे.

Leave a Comment