Tata cng cars : Tata च्या कार्सना ग्राहकांची चांगली पसंती मिळते. मागणी जास्त असल्याने कंपनीदेखील आपल्या शानदार फीचर्स असणाऱ्या कार्स लाँच करत असते. कंपनीची अशीच एक हायटेक कार ज्यात तुम्हाला जबरदस्त मायलेज मिळेल. तसेच तिची किंमत 7 लाखांपेक्षा कमी आहे.
मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन
हे लक्षात घ्या की कंपनीकडून टाटा टिगोरमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक असे दोन ट्रान्समिशन आहेत. ही कार पेट्रोल आणि सीएनजी इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. इतकेच नाही तर ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये कारला 4 स्टार रेटिंग मिळाले आहे. कंपनीच्या या शक्तिशाली कारमध्ये 1199 सीसी इंजिन असून या तुम्हाला कारच्या टॉप मॉडेलमध्ये अलॉय व्हील्स पाहायला मिळतील. तसेच यात इलेक्ट्रिक इंजिनचा पर्यायही उपलब्ध करून दिला आहे.
5 रंग पर्याय आणि किंमत
किमतीचा विचार केला तर टाटा टिगोर 6.29 लाख एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. ही 5 सीटर कॉम्पॅक्ट सेडान कार असून ज्यात 1199 cc चे पॉवरफुल इंजिन कंपनीकडून देण्यात आले आहे. कंपनीचा दावा आहे की ही कार पेट्रोलवर 19.2 kmpl मायलेज देईल, तर कारचे CNG इंजिन 28.06 kg/km मायलेज देईल. या शानदार कारचा ग्राउंड क्लीयरन्स 170 मिमी येत आहे, तुम्हाला ती 5 रंग पर्यायात खरेदी करता येईल.
टाटा टिगोरची फीचर्स
- टाटा टिगोरचे टॉप मॉडेल 11.49 लाख रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
- टाटा टिगोरचे XE, XM, XZ आणि XZ+ असे एकूण चार प्रकार आहेत.
- ऑटो एसी आणि 85bhp पॉवर
- एलईडी टेल लाइट आणि उच्च-माऊंट एलईडी स्टॉप दिवा
- 15-इंच चांदीची मिश्रित चाके
- प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि एलईडी डीआरएल
- कॉन्ट्रास्ट-ब्लॅक रूफ आणि क्रोम इन्सर्ट
- 7 इंच टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम
- डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर