Tata Car Discount : धमाकेदार ऑफर! टाटाच्या ‘या’ टॉप मॉडेलवर मिळतेय 1.33 लाखांची सवलत, पहा लिस्ट

Tata Car Discount : जर तुम्ही टाटाची कार खरेदी करायला गेला तर तुम्हाला लाखो रुपयांची बचत करता येईल. कारण कंपनीच्या काही निवडक कारवर 1.33 लाख रुपयांची बचत करता येईल. जाणून घ्या संपूर्ण ऑफर.

टाटाच्या कारवर मिळत आहे 1.33 लाख रुपयांची शानदार सवलत

टाटाचा जुना स्टॉक विकून टाकण्यासाठी टाटा मोटर्सने खूप चांगली सवलत दिली आहे. छोट्या कार Tiago पेट्रोलवर 90,000 रुपयांची सवलत उपलब्ध आहे. तर टिगोरवर तुम्हाला ८५,००० रुपयांपर्यंतची शानदार बचत करता येईल. इतकेच नाही तर कंपनीच्या प्रीमियम हॅचबॅक कार Altroz ​​रेंजवर 70,000 रुपये वाचवण्याची संधी तुमच्याकडे उपलब्ध आहे.

त्याशिवाय तुम्हाला कॉम्पॅक्ट SUV Nexon रेंजवर 95,000 रुपयांपर्यंत सवलत मिळेल. त्यामुळे हॅरियरवर तुम्हाला 1.33 लाख रुपयांची कमाल बंपर सवलत देण्यात येत आहे. याशिवाय सफारीवर १.३३ लाख रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे.

नवीन स्टॉकवर देखील मिळेल सवलत

हे लक्षात घ्या की Tata Motors नवीन स्टॉकवर खूप कमी सूट मिळत आहे. कंपनीच्या Tigor, Altroz, Tiago, Nexon Harrier Safri वर तुम्हाला 25,000 ते 60,000 रुपयांपर्यंत शानदार सवलत मिळेल. अशा वेळी जुना स्टॉक खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते.

जुना स्टॉक खरेदी करावा का?

जर तुम्हाला पैसे वाचवायचे असतील तर जुना स्टॉक करायला हरकत नाही. हे सर्वोत्कृष्ट करार असल्याचे सिद्ध होत आहे. कारण नवीन मॉडेलवर कोणतीही विशेष सवलत उपलब्ध करून दिली नाही. अशातच आज टाटा आपली नवीन Altroz ​​Racer लाँच करणार आहे. कंपनीने ही कार अशा लोकांसाठी डिझाइन केली आहे ज्यांना फन ड्राईव्ह आवडते.

Leave a Comment