Tariff Hike for Mobile Recharge | राहा तयार! निवडणुकीनंतर रिचार्ज देणार झटका; पहा, काय आहे कंपन्यांचा प्लॅन?

Tariff Hike for Mobile Recharge : मागील दोन वर्षांपासून मोबाईल रिचार्ज प्लॅनच्या किंमतीमध्ये कोणताही (Tariff Hike for Mobile Recharge) बदल झालेला नाही. पण आता लवकरच या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. देशात 5 जी लाँच होऊन दोन वर्षे झाली आहेत आणि अनेक लोकांकडे 5g मोबाईल आले आहेत. 5 जी तंत्रज्ञान देशातील बहुतेक शहरांमध्ये पोहोचले आहे. 5 जी लॉन्च करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांनी मोठा पैसा खर्च केला आहे आणि हा पैसा वसूल करण्याची वेळ आता आलेली आहे.

निवडणुकीनंतर सर्व टेलिकॉम कंपन्यांचे प्लॅन महाग होण्याची शक्यता आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या दूरसंचार कंपनीने याची खात्री केली आहे. सार्वत्रिक निवडणुकीनंतर मोबाइलच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती 20 टक्क्यांनी वाढतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Business Idea on Rooftop : तुमच्या घराचं छतही देईल बक्कळ पैसा; ‘या’ 3 पैकी कोणताही बिजनेस सुरू करा

Tariff Hike for Mobile Recharge

यामुळे त्याचा EBITDA 12 ते 15 टक्क्यांनी वाढेल. कंपनीने असेही म्हटले आहे की यामुळे प्रति वापरकर्ता सरासरी महसूल 270 रुपयांनी वाढेल. निवडणुकीनंतर नवीन रिचार्ज योजनाही सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही कंपनीचा 100 रुपयांचा प्लॅन उपलब्ध असेल तर उदाहरणावरून समजले तर जर टेरिफ प्लॅनची किंमत 20 टक्क्यांनी वाढली तर शंभर रुपयांचा प्लॅन 120 रुपयांचा होईल. 700 रुपयांच्या प्लॅनची किंमत 820 रुपये होईल असे गणित आहे. जर मोबाईल कंपन्यांनी हा निर्णय घेतला तर सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसू शकतो. त्यांना नेहमीच्या रिचार्जसाठी जास्त पैसे मोजावे लागतील. त्यामुळे त्यांचे महिन्याचे बजेट देखील बिघडू शकते. आता निवडणुकीनंतर कंपन्या याबाबत काही निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

SBI : एसबीआयच्या करोडो ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 31 मार्चनंतर घेता येणार नाही ‘या’ योजनांचे लाभ

Leave a Comment