Tamil Nadu Lok Sabha Election : देशात सध्या लोकसभा निवडणुकांचे वातावरण आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या ( Tamil Nadu Lok Sabha Election) नावांची घोषणा केली जात आहे. निवडणुकीच्या रिंगणात तुम्हाला असे अनेक उमेदवार दिसतील जे अनेकदा विजयी झाले आहेत. काही जणांनी तर निवडणुकीचे मॅनेजमेंट चांगलच आत्मसात केलं आहे. तर काही जण असेही आहेत की जे अगदीच सर्वसामान्य आहेत. पण ते काहीही असले तरी प्रत्येकाचं ध्येय निवडणूक जिंकण्याचच आहे. परंतु याच निवडणुकीत असाही एक उमेदवार आहे ज्याने निवडणुकीत पराभूत होण्याचं रेकॉर्डच केलं आहे. त्याने इतक्या वेळा पराभव पाहिले आहेत की या कामगिरीमुळे चक्क लिम्का बुकमध्ये त्याचं नाव नोंदल गेलं आहे. तुम्हाला कदाचित विश्वास बसणार पण हे खरं आहे.
तमिळनाडूमधील के. पद्मराजन यांचा आतापर्यंत (K. Padmarajan) निवडणुकीत तब्बल 238 वेळा पराभव झाला आहे. तरीदेखील या पराभवाचा कोणताही विचार न करता त्यांनी या लोकसभा निवडणुकीतही शड्डू ठोकला आहे. पद्मराजन यांनी धर्मपुरी जिल्ह्यातील मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. के. पद्मराजन टायर दुरुस्तीचे दुकान चालवतात. सन 1988 पासून त्यांनी निवडणुका लढण्यास सुरुवात केली. छोटी मोठी कोणतीही निवडणूक असो पद्मराजन उमेदवारी करणार म्हणजे करणारच. मग त्या निवडणुकीचा निकाल काहीही लागो.
Tamil Nadu Lok Sabha
पद्मराजन निवडणुकीत उतरतात. विजय मिळाला तर ठीक नाही मिळाला तर नव्या जोमाने पुढील निवडणुकीची तयारी करतात. आताच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीने काम करण्यास सुरुवात केली आहे. आता इतक्या वेळेस निवडणुकीला उभं राहूनही विजय मिळत नसेल तर लोक हसणारच ना. लोकं हसतातही पण, पद्मराजन याचा बिलकुल विचार करत नाहीत. प्रत्येक उमेदवार निवडणुकीत विजय मिळावा असं त्याला वाटत असतं पण माझं तसं नाही. मी निवडणुकीत पराभूत झालो तरी तो माझा विजयच आहे असे मी समजतो. पराभूत झाल्यानंतरही मला आनंद मिळतो, असे पद्मराजन सांगतात.
निवडणूक लढण्याच्या त्यांच्या याच इच्छेमुळे त्यांना इलेक्शन किंग या नावाने ओळखले जाऊ लागले आहे. अगदी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपासून ते स्थानिक पातळीवरील निवडणूक पद्मराजन यांनी लढवली आहे. निवडणूक लढवणे सर्वसामान्य माणसांसाठी सोपे नाही. सर्वात आधी उमेदवारी अर्ज दाखल करताना 25 हजार रुपये डीपॉझिट जमा करावे लागते. त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीत किमान 16 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली तरच अनामत रक्कम पुन्हा उमेदवाराला मिळते अन्यथा ही रक्कम जप्त होते.
Tamil Nadu Lok Sabha
Lok Sabha Election 2024 : भाजपला डबल धक्का! ‘या’ राज्यात युती होण्याआधीच तुटली
पद्मराजन यांचे आतापर्यंत 2011 विधानसभा निवडणुकीत सर्वोत्कृष्ट प्रदर्शन राहिले आहे. या निवडणुकीत त्यांना 6 हजार 273 मते मिळाली होती. परंतु या निवडणुकीत सुद्धा त्यांचा पराभव झाला होता. तरीदेखील पद्मराजन याची चिंता करत नाहीत. त्यांचं एकच लक्ष्य आहे ते म्हणजे सामान्य माणूस सुद्धा निवडणूक लढू शकतो हे त्यांना सिद्ध करून दाखवायचं आहे.