Taliban : अफगाणिस्तानमधील तालिबान (Taliban) सरकारने पाकिस्तानला पुन्हा एकदा जोरदार झटका दिला आहे. पाकिस्तानने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत असा आरोप करत तालिबान सरकारने पाकिस्तानबरोबरील मुख्य व्यापार आणि सीमेवरील बॉर्डर पॉइंटवरील एक पॉइंट बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तोरखममधील अफगाण तालिबान आयुक्तांनी सांगितले की,यात्रा आणि व्यापारासाठी आवश्यक बॉर्डर पॉइंट बंद करण्यात आला आहे.
अफगाणिस्तान (Afghanistan) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील सीमेवरील हालचाली सोमवारपासून बंद करण्यात आल्या आहेत. दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. यासोबतच या भागात राहणाऱ्या लोकांनी या सामान्यतः गजबजलेल्या परिसरात गोळीबाराचे आवाज ऐकू आल्याची माहिती दिली आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील अधिकाऱ्यांनी खैबर खिंडीजवळील तोरखाम सीमा क्रॉसिंग का बंद केले हे स्पष्ट नाही, परंतु अफगाणिस्तानचे सत्ताधारी तालिबान आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध बिघडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
- IND vs PAK : क्रिकेट चाहत्यांची घोर निराशा; पाकिस्तान संघाने घेतला ‘हा’ निर्णय
- PM-SHRI Scheme : शाळा होणार मॉडेल; ‘त्यासाठी’ मोदी सरकारने 9 हजार शाळा केल्या सिलेक्ट
- PF Balance : कंपनी तुमच्या खात्यात पीएफचे पैसे टाकते का ? ; ‘या’ सोप्या पद्धतींनी मिळवा माहिती
- Railway Fuel Pump : कुठे असतात रेल्वेचे पेट्रोल पंप ?, कसे भरतात इंधन ?, किती मिळतो मायलेज ?; वाचा..
- TV Viewing Distance : टीव्ही किती अंतरावरून पहावा ? ; तुम्ही ‘ही’ चूक तर करत नाही ना, जाणून घ्या..
पूर्व अफगाण प्रांत नांगरहारमधील तालिबान प्रशासनाच्या पोलिस दलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, सीमा बंद करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रविवारी संध्याकाळी सीमा बंद करण्यात आली होती. मात्र, कोणतेही कारण सांगण्यात आले नाही. या भागात तैनात असलेल्या दोन पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्यांनी सीमा बंद केल्याची खात्री केली असून दोन्ही बाजूंनी गोळीबार (Firing) सुरू आहे.
2600 किमी लांबीच्या सीमेशी संबंधित वाद हे दोन देशांमधील अनेक दशकांपासून संघर्षाचे मुख्य कारण आहे. तोरखाम बॉर्डर पॉईंट हे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दरम्यान प्रवासी आणि मालाच्या वाहतुकीचे मुख्य ठिकाण आहे.पाकिस्तानातील लोधी कोटला येथे राहणारे नागरिक म्हणतात, की रविवारी संध्याकाळी उशिरा सीमा बंद होती आणि सोमवारीही गोळीबार झाला. सकाळी गोळीबाराचा आवाज आल्यावर आम्ही घाबरलो. आम्हाला वाटले की दोन्ही देशांतील पक्षांमध्ये भांडणे सुरू झाली आहेत. दोन देशांमधील सीमावाद वर्षानुवर्षे सुरू आहे.
अफगाणिस्तानच्या जमिनीवरून दहशतवादाचा धोका जगात पसरू शकतो, असे पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी रविवारी जर्मनीत झालेल्या सुरक्षा बैठकीदरम्यान सांगितले. या वक्तव्यानंतर अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले होते की, पाकिस्तानने हा मुद्दा सार्वजनिक व्यासपीठावर नव्हे तर खाजगीत सांगावा. मंत्रालयाने म्हटले आहे की तालिबान व्यवस्थापन आपल्या जमिनीचा वापर इतर देशांविरुद्ध होऊ देणार नाही.