T20 World Cup Yuvraj Singh : टी 20 विश्वचषक सुरू होण्यास आता फक्त 36 दिवस उरले (T20 World Cup) आहेत. यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारतीय माजी खेळाडू युवराज सिंगला T20 विश्वचषकाचा ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. युवराज सिंग म्हणाला की माझ्याकडे T20 विश्वचषकाच्या काही चांगल्या आठवणी आहेत. त्यामुळे या स्पर्धेचा भाग बनणे माझ्यासाठी खूप महत्वाचे असेल.
आयसीसी टी20 विश्वचषकाचे आयोजन भारतातील T20 लीगच्या स्पर्धांनंतर काही दिवसांनी होणार आहे. अमेरिका आणि वेस्टइंडिज संयुक्तपणे या स्पर्धेचे 1 जून ते 29 जून दरम्यान आयोजन करणार आहेत. या स्पर्धेचे वेळापत्रक आधीच प्रसिद्ध करण्यात आले आहे. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगला या स्पर्धेसाठी ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्त केले आहे.
T20 World Cup
सन 2007 मध्ये झालेल्या पहिल्या T20 विश्वचषकात युवराज सिंगने एकाच ओव्हरमध्ये सहा षटकार मारण्याचा विश्वविक्रम केला होता. त्याचवेळी हा विश्वचषक भारताला जिंकून देण्यात युवराजने महत्त्वाची भूमिका बजावली होती. आयसीसीने घेतलेल्या या निर्णयावर युवराज सिंगने प्रतिक्रिया दिली आहे. युवराज सिंग म्हणाला, माझ्याकडे टी20 विश्वचषकातील काही चांगल्या आठवणी आहेत. त्यामुळे या स्पर्धेचा भाग होणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. ही आतापर्यंतचा सर्वात मोठी स्पर्धा असेल त्याचा एक भाग होणे ही माझ्यासाठी निश्चितच सन्मानाची गोष्ट आहे.
युवराज पुढे म्हणाला, न्यूयॉर्कमध्ये भारताचा पाकिस्तानविरुद्धचा सामना यावर्षीच्या जगातील सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक असणार आहे. त्यामुळे त्याचा भाग होणे आणि जगातील क्रिकेट खेळाडूंना एका नवीन स्टेडियममध्ये खेळताना पाहणे माझ्यासाठी विशेष असेल.
T20 World Cup
T20 World Cup 2024 : पाऊस आला तरी सामना होणारच! ‘आयसीसी’चा नवा नियम काय?
यावेळी टी20 विश्वचषक स्पर्धेमध्ये 20 क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत. या आधीच्या कोणत्याही स्पर्धेमध्ये इतक्या मोठ्या संख्येने संघ सहभागी झाले नव्हते. या स्पर्धेत एकूण 55 सामने 9 ठिकाणी आयोजित केले जाणार आहेत. 29 जून रोजी बार्बाडोस येथे अंतिम सामना होणार आहे. पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा यांच्यात होणार आहे.