T20 World Cup 2024 : यंदा टी 20 विश्वचषक स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी क्रिकेट संघांनी तयारी केली असून 15 सदस्यीय संघांची घोषणा होत आहे. या स्पर्धेसाठी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेने आपापल्या संघांची घोषणा केली. यंदा या स्पर्धेत सर्वाधिक म्हणजे 20 क्रिकेट संघांनी भाग घेतला आहे. इतक्या मोठ्या संख्येने संघांचा स्पर्धेत सहभाग बहुधा पहिल्यांदाच असावा. या स्पर्धेसाठी भारतासह अन्य काही देशांनी संघांची घोषणा केली आहे.
वेस्टइंडिजने संघात स्टार खेळाडूंचा समावेश केला आहे. अष्टपैलू खेळाडू आणि वेगवान गोलंदाजांना संघात जागा दिली आहे. त्यामुळे यावेळी विंडीजचा संघ मजबूत वाटत आहे. परंतु, मॅचविनर फिरकी गोलंदाजाकडे मात्र दुर्लक्ष केले आहे. सुनील नारायण भारतात सुरू असलेल्या टी 20 प्रीमियर लीगमध्ये दमदार कामगिरी करत आहे. सुनीलनेच विश्वचषकात सहभागी होण्यासाठी फारशी उत्सुकता दाखवली नव्हती. त्यामुळे निवडकर्त्यांनीही मग त्याचा विचार केला नाही.
T20 World Cup | ICC कडून युवराजला खास गिफ्ट; T20 विश्वचषकात दिसणार ‘या’ भूमिकेत
T20 World Cup
विंडीज संघात जॉन्सन चार्ल्स, ब्रँडन किंग, शाई होप या फलंदाजांना संधी मिळाली आहे. निकोलस पूरन, पॉवेल, जेसन होल्डर, शेरफेन रुदरफोर्ड आणि रोमारियो शेफर्ड यांसारख्या अष्टपैलू खेळाडूंना संधी दिली आहे. टी 20 वर्ल्डकपसाठी वेस्टइंडिजचा संघात रोवमन पॉवेल, अल्जारी जोसेफ, जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेज, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, अकील होसेन, शाई होप, शमर जोसेफ, ब्रँडन किंग, गुडाकेश मोती, निकोलस पूरन, आंद्रे रसेल, शेरफेन रुदरफोर्ड, रोमारियो शेफर्ड या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
अमेरिकेचाही संघ जाहीर
टी 20 विश्वचषक स्पर्धेसाठी यजमान अमेरिकेनेही आपल्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. अमेरिकेच्या संघात न्यूझीलँडचा माजी अष्टपैलू खेळाडू कोरी अँडरसनला संधी मिळाली आहे. अँडरसनने याआधी तीन विश्वचषकात न्यूझीलँडचे प्रतिनिधीत्व केले होते. आता मात्र तो अमेरिकेच्या संघात दिसणार आहे.
T20 World Cup
T20 World Cup 2024 | टीम इंडियाची घोषणा, रोहितच्या हाती कमान, ‘या’ खेळाडूंचा कटला पत्ता
या संघात उन्मुक्त चंदला मात्र संधी मिळाली नाही. मागील महिन्यात कॅनडात झालेल्या स्पर्धेतही त्याला संधी मिळाली नव्हती. त्यामुळे त्याच्या विश्वचषकातील सहभागावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आज या चर्चांना पूर्णविराम मिळाला. संघात त्याची निवड झाली नाही. विशेष म्हणजे, उन्मुक्त चंदच्या उपस्थितीत भारतीय संघाने अंडर 19 विश्वचषकावर नाव कोरलं होतं.