मुंबई : टी20 वर्ल्डकप सामने सध्या जोरात आहेत. त्यात अनेक भारतीय खेळाडूंनी अनेकांची मने जिंकली आहेत. महत्वाचे म्हणजे जगातील अव्वल क्रमांकाचा टी-२० प्लेअर भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादव याने पल्या कामगिरीने सर्वांची वाहवा मिळवली आहे. अनेक माजी खेळाडूंकडून त्याचे सतत कौतुक होत आहे. आता भारताशिवाय इतर देशांतील माजी खेळाडूही त्यांचे चाहते झाले असताना या यादीत पाकिस्तानचे दोन माजी कर्णधार वसीम अक्रम आणि वकार युनूस यांचेही नाव आले आहे.
एका टीव्ही मुलाखत कार्यक्रमात त्याने सुर्याची स्तुती केली. मात्र, आफ्रिदीला पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि सूर्यकुमार यादव याच्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो काहीसा भडकला. तो म्हणाला की, दोघांची तुलना होऊ शकत नाही. पाकिस्तानचा माजी कर्णधार पुढे म्हणाला की, सुर्याला त्याच्या खेळाची चांगली जाणीव आहे. रविवारी (६ नोव्हेंबर) भारत आणि पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने ३२ चेंडूत ३२ धावा, सूर्यकुमारने २५ चेंडूत नाबाद ६१ धावा केल्या.
आफ्रिदीने सूर्यकुमारचे जाम कौतुक करत म्हटले की, ‘तो खूप सामने खेळून भारतीय संघात आला आहे. त्याला खेळाची माहिती आहे. तो कोणताही शॉट घेतो आणि चांगल्या चेंडूंवर शॉट मारतो. त्यासाठी त्याने खूप सराव केला आहे. तुमच्यात जितकी क्षमता असेल तितके तुम्ही प्रभावी व्हाल यासाठी तुम्हाला तुमचे शॉट्स वाढवावे लागतील असे हे त्याचे स्वरूप असे आहे. आफ्रिदीच्या आधी वसीम अक्रम म्हणाला होता की, मला वाटतं सूर्यकुमार दुसऱ्या ग्रहातून आला आहे. तो इतर फलंदाजांपेक्षा खूप वेगळा आहे.