T20 World Cup : T20 विश्वचषक 2022 (T20 World Cup) च्या पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय नोंदवून इतिहास (India Beat Pakistan) रचला आहे. ऑस्ट्रेलियाचा 19 वर्ष जुना विश्वविक्रम मोडत टीम इंडिया (Team India Achieve New Record) एका वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारा संघ बनला आहे. या वर्षात भारताचा पाकिस्तानविरुद्धचा हा 39 वा विजय ठरला. 2003 मध्ये रिकी पाँटिंगच्या (Ricky Ponting) नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 38 विजयांसह हा विश्वविक्रम केला होता. टीम इंडियाचे या वर्षी अजून बरेच सामने बाकी आहेत, त्यामुळे भारताला नवा विक्रम करायला आणखी संधी आहे.
रिकी पाँटिंगच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने (Australia) 2003 मध्ये 30 वनडे आणि 8 कसोटी सामने जिंकून हा विक्रम केला होता. पण यावर्षी भारताने दोन कसोटी, 13 वनडे आणि 24 टी-20 सामने जिंकून हा विश्वविक्रम केला आहे. याआधीही भारत एकदा ऑस्ट्रेलियाच्या या विक्रमाच्या जवळ आला होता, पण तो हुकला होता. 2017 मध्ये भारताने 37 विजय नोंदवले होते.
मात्र, भारतासाठी वर्षाची सुरुवात चांगली झाली नाही. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात टीम इंडियाला जिथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) दोन कसोटी सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते, त्याच संघाविरुद्ध केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वात टीम इंडियाने वनडे मालिका 0-3 ने गमावली. वर्षाची खराब सुरुवात केल्यानंतर भारताचा हा विक्रम कौतुकास्पद आहे.
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या T20 विश्वचषकात भारताला अजून किमान 4 सामने खेळायचे आहेत, तर संघाने अंतिम फेरी गाठली तर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसह दोन अतिरिक्त सामने खेळले जातील. वर्षाच्या अखेरीस, टीम इंडिया दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेव्यतिरिक्त बांगलादेशविरुद्ध (Bangladesh) तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळणार आहे.
- Read : Virat Kohli : कोहलीसाठी ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने भारतीयांकडे केली ‘ही’ मागणी; जाणून घ्या..
- IND vs PAK T20 World Cup: ‘इतक्या’वर गुंडाळला पाकचा डाव; पहा भारतीय गोलंदाजांची कमाल
- T20 World Cup IND Vs PAK: म्हणून पाणावले रोहितचे डोळे; पहा व्हायरल व्हिडिओ
- T20 World Cup : वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड संतापले..! संघाच्या खराब कामगिरीनंतर करणार ‘हे’ काम..