T20 World Cup : मुंबई : भारतीय संघ 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने (IND vs Pak) टी-20 विश्वचषक (T20 World cup) मोहिमेची सुरुवात करेल. टीम इंडिया (Team India) 15 वर्षांनंतर विजेतेपदावर लक्ष ठेवत आहे. 2007 मध्ये पहिलाच टी-20 विश्वकप भारतीय संघाने जिंकला होता. यावेळी जर भारतीय संघ चॅम्पियन झाला तर रोहित शर्मा (Rohit Sharma) टी-20 मध्ये देशाचा नंबर 1 कर्णधार बनेल. तो माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा (Mahendra Singh Dhoni) मोठा विक्रम मोडेल.
वास्तविक, रोहितने त्याच्या नेतृत्वाखाली 35 सामने जिंकले आहेत. या स्पर्धेत तो धोनीचा सर्वाधिक 41 विजयांचा विक्रम मोडू शकतो. धोनीने 72 टी-20 सामन्यांमध्ये देशाचे नेतृत्व केले. या दरम्यान 41 विजय आणि 28 पराभव झाले. एक सामना बरोबरीत तर दोनचा निकाल लागला नाही. रोहितबद्दल सांगितले तर तो धोनीपेक्षा सहा विजयांनी मागे आहे आणि त्याला मागे टाकण्यासाठी सात विजय आहेत. रोहितने 45 सामन्यात कर्णधारपद भूषवले असून 35 सामने जिंकले आहेत. 10 मध्ये त्यांचा पराभव झाला आहे.
सर्वात यशस्वी कर्णधाराच्या बाबतीत विराट कोहली (Virat Kohli) तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 50 टी-20 सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले. या दरम्यान भारताने 30 सामने जिंकले आणि 16 सामने गमावले. दोन सामन्यांचा निकाल लागला नाही. त्याचवेळी दोन सामने बरोबरीत सुटले. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकानंतर कोहलीने संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्याच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी निराशाजनक होती. भारतीय संघ सुपर-12 मध्येच बाद झाला. पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) पहिल्यांदाच विश्वचषकात त्याचा पराभव स्वीकारावा लागला होता.
रोहितला या विश्वचषकात धोनीचा विक्रम मोडायचा असेल तर त्याला गटातील पाचही सामने तसेच त्याच्या नेतृत्वात उपांत्य आणि अंतिम सामना जिंकावा लागेल. अशा स्थितीत रोहितला सात विजय मिळतील. मग तो धोनीला मागे टाकेल. भारतीय संघ 23 ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. 27 ऑक्टोबर रोजी संघाचा सिडनी येथे दुसरा सामना होईल. दक्षिण आफ्रिकेचा (IND vs South Africa) सामना पर्थमध्ये 30 ऑक्टोबरला होणार आहे. 2 नोव्हेंबरला अॅडलेडमध्ये बांगलादेशविरुद्ध (IND vs Bangladesh) सामना होणार आहे. त्याचवेळी 6 नोव्हेंबरला टीम इंडिया मेलबर्नमध्ये खेळणार आहे. विरोधी संघाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. या स्पर्धेतील उपांत्य फेरीचे दोन सामने 9 नोव्हेंबरला सिडनी (Sydney) आणि 10 नोव्हेंबरला अॅडलेड (Adelaide) येथे होणार आहेत. अंतिम सामना 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्न (Melbourne) येथे होणार आहे.
- Read : Rohit Sharma: BCCI देणार रोहीतला धक्का; ‘हा’ खेळाडू बनणार टीम इंडियाचा नवा कर्णधार
- Virat Kohli : विराटने केला ‘हा’ खास विक्रम.. जगातील ‘या’ दिग्गज फलंदाजांना टाकले मागे; जाणून घ्या..
- ICC T20 World Cup : आता क्रिकेटमध्ये पावसाचे टेन्शन नाही; आयसीसीने केलीय ‘ही’ खास तयारी, जाणून घ्या..