T20 World Cup : T20 विश्वचषक 2022 (T20 World Cup) मधील पहिला सामना गमावलेल्या श्रीलंकेच्या (Sri Lanka) संघाला दुसऱ्या सामन्यात दणदणीत विजय मिळाला, मात्र या दरम्यान श्रीलंकेच्या क्रिकेट संघाला स्पर्धेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख गोलंदाजांपैकी एक असलेल्या दुष्मंथा चमिराला (Dushmantha Chameera) दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषक 2022 मधून बाहेर काढण्यात आले आहे.
क्रिकबझच्या मते, श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमिरा उर्वरित टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. या वेगवान गोलंदाजाला पुन्हा एकदा गंभीर दुखापत झाली आहे. चमीराला दुखापतीमुळे 2022 च्या आशिया चषक स्पर्धेतून (Asia Cup 2022) बाहेर काढण्यात आले होते, परंतु पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर T20 विश्वचषक संघात समाविष्ट करण्यात आले, जिथे तो पहिले दोन सामने खेळला.
संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्ध श्रीलंकेच्या 79 धावांनी शानदार विजयात या 30 वर्षीय खेळाडूने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने विकेट घेतल्या आणि एकूण 15 धावा दिल्या. नामिबियाविरुद्धही (Namibia) त्याने विकेट घेतली होती, पण त्या सामन्यात फलंदाजांमुळे संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते.
यूएईविरुद्धच्या सामन्यात त्याला दुखापत झाली आणि तो मैदानाबाहेर गेला. श्रीलंकेचा फलंदाज दनुष्का गुनाथिलका आणि वेगवान गोलंदाज प्रमोद मदुशन हेदेखील फिटनेसच्या समस्येचा सामना करत आहेत. आता श्रीलंका क्रिकेट बोर्ड (Sri Lanka Cricket Board) काय निर्णय घेते हे पाहायचे आहे. मात्र, श्रीलंकेच्या संघात चार राखीव खेळाडू आहेत ज्यात अशेन बंडेरा, प्रवीण जयविक्रम, दिनेश चंडिमल आणि नुवानिडू फर्नांडो यांचा समावेश आहे. दुष्मंथा चमीराच्या जागी यापैकी एका खेळाडूला संधी दिली जाईल, असे मानले जात आहे. मात्र, श्रीलंका क्रिकेट बोर्डाने अद्याप त्याच्या बाहेर पडण्याची खात्री केलेली नाही.
- Read : BCCI President: अध्यक्षाची धुरा सांभाळताच दिले नवे बदलाचे संकेत; पहा काय असतील बदल
- ICC T20 World Cup : आता क्रिकेटमध्ये पावसाचे टेन्शन नाही; आयसीसीने केलीय ‘ही’ खास तयारी, जाणून घ्या..
- T20 World Cup 2022 : T20 मध्ये पडणार पैशांचा पाऊस; विजेत्या संघाला मिळणार ‘इतके’ कोटी; जाणून घ्या, बक्षिसांची रक्कम