T20 World Cup 2024 : वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून 3 मोठे खेळाडू बाहेर होणार आहे. त्यांच्या खराब फॉर्ममुळे संघाची चिंता वाढली आहे.
सराव सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 182/5 धावा केल्या. टीम इंडियाच्या प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ फक्त 120 धावा करू शकला. भारताकडून मोहम्मद सिराजने 17 धावांत 1 बळी, जसप्रीत बुमराहने 12 धावांत 1 बळी अर्शदीप सिंगने 12 धावांत 2 बळी तर शिवम दुबेने शेवटच्या षटकात 2 बळी घेतले.
या खेळाडूंना मिळणार नाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी
शिवम दुबे
भाताचा युवा अष्टपैलू शिवम दुबेलाही या सराव सामन्यात खेळण्याची संधी मिळाली पण त्याची कामगिरी काही खास झाली नाही. फलंदाजी करताना तो पूर्णपणे फ्लॉप ठरला असून त्याला 16 चेंडूत फक्त 14 धावा करता आल्या. या काळात त्याने फक्त एकच षटकार मारला आहे. जरी गोलंदाजीत त्याने 2 विकेट्स नक्कीच घेतल्या पण शेवटी त्याने या विकेट घेतल्या. शिवम दुबेची कामगिरी पाहता त्याला पहिल्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणे अवघड आहे.
संजू सॅमसन
या सामन्यात यशस्वी जैस्वाल खेळला नाही पण त्याच्या जागी संजू सॅमसनला संधी दिली आहे. कर्णधार रोहित शर्मानेही त्याला सलामी दिली असे असले तरी त्याचा अजिबात फायदा उठवता आला नाही. संजू सॅमसनने 6 चेंडूंचा सामना केला पण तो केवळ 1 धाव काढून बाद झाला. त्याचा खराब फॉर्म लक्षात घेता त्याला पहिल्या सामन्यातूनही वगळण्याची शक्यता आहे.
युझवेंद्र चहल
अनुभवी फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलला बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात खेळवले नाही. या सामन्यात टीम इंडियाने एकूण 8 गोलंदाजांचा वापर केला होता, पण युझवेंद्र गोलंदाजी करताना दिसला नाही. रोहित शर्माच्या या निर्णयानंतर असे बोलले जात आहे की कदाचित चहल पहिल्या सामन्यात सहभागी होणार नाही आणि असे असल्याने त्याला सराव सामन्यात खेळवले नाही.