BCCI Announced Team India Squad for T20 World Cup 2024 : आगामी टी-20 विश्वचषकासाठी अखेर (T20 World Cup 2024) भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली. बीसीसीआयने प्रदीर्घ बैठकीनंतर टीम इंडियाच्या संघाची अधिकृत घोषणा केली. रोहित शर्माकडे संघाची कमान सोपविण्यात आली आहे तर उपकर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पांड्याला दिली आहे.
संजू सॅमसन आणि ऋषभ पंत यांचा भारतीय संघात विकेटकीपर म्हणून समावेश करण्यात आला आहे तर केएल राहुलला संघातून वगळण्यात आले आहे. केएल राहुल मागील टी 20 विश्वचषकात भारतीय संघाचा भाग होता. परंतु यावेळी त्याला संधी देण्यात आली नाही.
केएल राहुल शिवाय रिंकू सिंह आणि शुभमन गिललाही संघात स्थान दिले गेले नाही. मात्र बीसीसीआयने रिंकू सिंह, शुभमन गिल आणि आवेश खान यांना राखीव खेळाडू म्हणून संघात घेतले आहे. रिंकू सिंहपेक्षा शिवम दुबेला प्राधान्य देण्यात आले आहे. टी 20 प्रीमियर लीगमध्ये शिवम दुबेने चांगली कामगिरी केली आहे आणि या कामगिरीची दखल बीसीसीआयने घेतली आहे.
T20 World Cup | ICC कडून युवराजला खास गिफ्ट; T20 विश्वचषकात दिसणार ‘या’ भूमिकेत
T20 World Cup 2024
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव यांच्या शिवाय भारतीय फलंदाजीत महत्त्वाचे खेळाडू असतील. त्याचबरोबर शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल यांनाही संघात घेतले गेले आहे. यशस्वी रोहितसोबत डावाची सुरुवात करताना दिसणार आहे तर शिवम दुबे मॅच फिनिशरच्या भूमिकेत असेल.
भारतीय संघातील विकेटकीपरबाबत दिग्गजांमध्ये अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती मात्र आता बीसीसीआयने भारतीय संघाचे अधिकृत घोषणा करून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. संजू सॅमसन आणि ऋषभ पंत या दोघांचाही भारतीय संघात विकेटकीपर म्हणून समावेश करण्यात आला आहे तर केल राहुलला मात्र यावेळी संधी मिळालेली नाही.
T20 World Cup 2024
भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याकडे देण्यात आली आहे. त्याच्याशिवाय अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांचा अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे.
युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांना संघात फिरकीपटू म्हणून संधी मिळाली आहे. टी 20 विश्वचषक वेस्टइंडीज आणि अमेरिकेत संयुक्तपणे आयोजित केला जाणार आहे अशा परिस्थितीत कुलदीप आणि चहलची जोडी तिथल्या संथ खेळपट्टीवर नक्कीच चमत्कार करताना दिसेल. वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांच्यावर भारतीय संघ अवलंबून असेल याशिवाय तिसरा गोलंदाज म्हणून सिराजला संधी देण्यात आली आहे तर दुखापतीमुळे शमी या स्पर्धेतही खेळणार नाही.