T20 World Cup 2024 : यंदा टी 20 विश्वचषक स्पर्धा जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडीज या दोन (T20 World Cup 2024) देशात होणार आहे. या स्पर्धेत 20 संघ सहभागी होणार आहेत. इतक्या मोठ्या संख्येने क्रिकेट संघ सहभागी होण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे. क्रिकेट सामना म्हटला की कधी ना कधी तरी पाऊसही येतो. पाऊस लवकर थांबला तर ठीक नाहीतर सामना रद्द करावा लागतो, असे अनेकदा घडले आहे. याआधी अनेक सामने रद्द करावे लागले आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड होतो. आता हीच गोष्ट लक्षात घेऊन यावेळच्या विश्वचषकासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
Indian Cricket : क्रिकेट सोडलं, पॉलिटिक्स सुरू केलं; राजकारणात ‘या’ खेळाडूंचं नशीब चमकलं
आयसीसीच्या अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत स्पर्धेतील उपांत्य आणि अंतिम सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच दुसऱ्या नंबरवर फलंदाजी करणाऱ्या संघाने कमीतकमी पाच ओव्हर टाकण्याची आवश्यकता असेल. पाच ओव्हर होण्याआधीच जर पाऊस आला तर हा सामना पूर्ण झाल्याचे मानले जाणार नाही.
T20 World Cup 2024
बाद फेरीच्या सामन्यांसाठी दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत असलेल्या संघाने किमान दहा ओव्हर टाकणं बंधनकारक राहणार आहे. यावेळी जर पाऊस आला तर हा सामना दुसऱ्या दिवशी खेळवण्यात येईल. यानंतर 2026 मध्ये भारतात होणाऱ्या टी20 विश्वचषक स्पर्धेच्या नामांकन प्रक्रियेला या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या स्पर्धेतही 20 संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा भारत आणि श्रीलंका दोन देश संयुक्त पद्धतीने आयोजित करणार आहेत.
T20 World Cup 2024 मधून Virat Kohli होणार बाहेर? निवडकर्ते उचलणार मोठे पाऊल
टी 20 विश्वचषकात विराट नाही?
T20 World Cup 2024
विराट कोहली (Virat Kohli) टी-20 क्रिकेटमध्ये संघाच्या गरजा पूर्ण करू शकत नाही. वास्तविक, मुख्य निवडकर्त्याने विराटशी त्याचा दृष्टिकोन बदलण्याबाबत बोलले होते. यानंतर विराटला अफगाणिस्तान मालिकेत आक्रमक क्रिकेट खेळायचे होते, पण त्यात तो यशस्वी होऊ शकला नाही. अशा परिस्थितीत आता विराट कोहलीला टी 20 क्रिकेट लीग स्पर्धेत मध्ये बंगळुरूकडून खेळताना दमदार कामगिरी करावी लागणार आहे.