Swift 2024 LXI : अवघ्या एक लाखातच घरी न्या नवीन लाँच झालेली स्विफ्ट, जाणून घ्या डिटेल्स

Swift 2024 LXI : मारुती सुझुकीने नुकतीच आपली Swift 2024 LXI लाँच केली. या शानदार कारमध्ये तुम्हाला उत्तम मायलेज आणि जबरदस्त फीचर्स मिळतील. तुम्ही आता हि कार अवघ्या एक लाखातच घरी नेऊ शकता. यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकते.

जाणून घ्या किंमत

किमतीचा विचार करायचा झाला तर New Swift 2024 चे बेस व्हेरिएंट LXI मारुतीने भारतीय बाजारात 6.49 लाख रुपये (नवीन स्विफ्ट किंमत) च्या एक्स-शोरूम किमतीत लॉन्च करण्यात आले आहे. कंपनीची ही नवीन कार दिल्लीत खरेदी केल्यास आरटीओसाठी सुमारे ४५ हजार रुपये आणि विम्यासाठी ३६ हजार रुपये मोजावे लागणार आहे. त्यानंतर रस्त्यावरील मारुती स्विफ्टची किंमत सुमारे ७.३१ लाख रुपये इतकी होते.

किती भरावा लागेल EMI?

तुम्ही या कारचा बेस व्हेरिएंट LXI खरेदी केला तर बँकेकडून केवळ एक्स-शोरूम किंमतीवर फायनान्स करता येईल. अशा वेळी 1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून सुमारे 6.31 लाख रुपयांचे फायनान्स करावा लागेल. बँक तुम्हाला नऊ टक्के व्याजासह पाच वर्षांसाठी 6.31 लाख रुपये देईल, तर तुम्हाला पुढील पाच वर्षांसाठी दरमहा 13099 रुपयांचा ईएमआय भरावा लागणार आहे.

तुम्ही बँकेकडून 6.31 लाख रुपयांचे कार कर्ज पाच वर्षांसाठी नऊ टक्के व्याजदराने घेतले तर तुम्हाला पाच वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 13099 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. अशा परिस्थितीत, तुम्हाला नवीन स्विफ्ट 2024 साठी पाच वर्षांत सुमारे 1.54 लाख रुपये व्याज द्यावे लागणार आहे. त्यानंतर तुमच्या कारची एक्स-शोरूम, ऑन-रोड आणि व्याजासह एकूण किंमत सुमारे 8.85 लाख रुपये इतकी असणार आहे .

Leave a Comment