Sweden Joins NATO : नाटो या अमेरिका आणि युरोपीय देशांच्या संघटनेत (Sweden Joins NATO) सहभागी होण्यासाठी युक्रेनकडून प्रयत्न (Ukraine) केले जात होते. परंतु, या हालचालींची कुणकुण लागताच रशियाने युक्रेनविरोधात युद्ध (Russia Ukraine War) पुकारले. या घटनेला आता दोन वर्षे उलटून गेली आहेत. युद्ध अजूनही सुरुच आहे. तर दुसरीकडे मागील दोन दशकांपासून अलिप्त राहिलेला स्वीडन अखेर (Sweden) गुरुवारी नाटोत सहभागी झाला. याआधी नाटो संघटनेत सहभागी देशांची संख्या 31 होती आता स्वीडनच्या एन्ट्रीने ही संख्या 32 झाली आहे.
या घडामोडीनंतर स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टीरसन म्हणाले, नाटोत सहभागी होणे आमच्यासाठी स्वातंत्र्याचा विजय आहे. स्वीडनने लोकशाही, निःपक्षपातीपणे, सार्वभौम आणि एकमताने नाटोत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन देखील उपस्थित होते.
नाटोचे सरचिटणीस जेंस स्टोल्टेनबर्ग यांनी सांगितले की हा एक ऐतिहासिक दिवस आहे. स्वीडनला आता नाटोत एक सन्मानाचे स्थान मिळाले आहे. स्वीडनची मते विचारात घेऊन नाटोची ध्येय आणि धोरणे निश्चित केली जातील. याआधी गुरुवारी स्वीडन सरकारची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर स्वीडन नाटोत सहभागी होत असल्याची घोषणा करण्यात आली.
Sweden Joins NATO
युक्रेन युद्धाच्या सुरुवातीपासूनच रशियाचे शेजारी देश स्वीडन आणि फिनलँड नाटोचे सदस्य होण्यासाठी प्रयत्न करत होते. फिनलँड मागील वर्षी नाटोचा सदस्य झाला त्यानंतर आता स्वीडननेही नाटोत एन्ट्री घेतली आहे. याचा अर्थ रशिया वगळता बाल्टिक समुद्राने वेढलेले सर्व देश आता नाटोचा भाग बनले आहेत. रशियासाठी हा मोठा धक्का आहे.
रशियानेही स्वीडनच्या नाटोमध्ये सामील झाल्यानंत एक निवेदन प्रसिद्ध केले. स्वीडनच्या या निर्णयाला नक्कीच प्रत्युत्तर दिले जाईल. जर स्वीडनमध्ये नाटोचे सैन्य तैनात केले गेले तर रशिया या विरुद्ध पावले उचलेल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
Ukraine Russia War | विनाशकारी युद्धाची दोन वर्षे; उद्धवस्त शहरे, हजारोंचा मृत्यू, अन् लाखो लोक बेघर
Sweden Joins NATO
रशियाने युक्रेनवर हल्ला (Ukraine Russia War) केला होता त्यावरून फिनलँड आणि स्वीडनला त्यांच्या सुरक्षिततेची काळजी वाटत होती. परंतु, स्वीडनच्या नाटोतील प्रवेशाला तुर्कीने आडकाठी केली होती. परंतु, अमेरिकेने तुर्कीच्या राज्यकर्त्यांचे मन वळवले आणि तुर्कीचा विरोध मावळला. या बदल्यात तुर्की आणि अमेरिकेत 23 अब्ज डॉलर्सच्या लढाऊ विमानांचा करार करण्यात आला.