Swaraj 735 XT Tractor : शेतकऱ्यांनो, ‘हा’ आहे 40 HP श्रेणीतील सर्वात शक्तिशाली ट्रॅक्टर, किंमतही आहे खूपच कमी

Swaraj 735 XT Tractor : शेतीच्या कामांसाठी आता ट्रॅक्टरचा वापर केला जाऊ लागला आहे. ट्रॅक्टरमुळे अनेक कामे जलद आणि सोप्या पद्धतीने होऊ लागली आहेत. ज्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. ट्रॅक्टर निर्मात्या कंपन्या देखील दरवर्षी अनेक ट्रॅक्टर लाँच करत असतात. Swaraj 735 XT Tractor हा 40 HP श्रेणीतील सर्वात शक्तिशाली ट्रॅक्टर असून तो शेतीसाठी सर्वोत्तम आहे.

जाणून घ्या स्वराज 735 XT ट्रॅक्टरची फीचर्स

स्वराज 735 XT ट्रॅक्टरमध्ये 2734 cc क्षमतेचे 3 सिलेंडर वॉटर कूल्ड इंजिन असून 40 HP पॉवर जनरेट करते. या ट्रॅक्टरमध्ये कंपनीने 3 स्टेज ऑइल बाथ प्रकारचे एअर फिल्टर दिले आहे, जे इंजिनचा धुळीपासून बचाव करते. कंपनीच्या या ट्रॅक्टरची कमाल PTO पॉवर 32.6 HP असून त्याचे इंजिन 1800 RPM जनरेट करते.

कंपनीचा हा ट्रॅक्टर 28.5 किमी प्रतितास फॉरवर्ड स्पीड आणि 10.5 किमी प्रतितास रिव्हर्स स्पीड ठेवला आहे. कंपनीचा हा जबरदस्त ट्रॅक्टर 45 लिटर क्षमतेच्या इंधन टाकीसह येतो. या ट्रॅक्टरची उचलण्याची क्षमता 1200 kg ठेवली असून त्याचे एकूण वजन 1930 kg इतके आहे. कंपनीने हा ट्रॅक्टर 1925 मिमी व्हीलबेसमध्ये 3385 मिमी लांबी आणि 1730 मिमी रुंदीसह सादर करण्यात आला आहे.

तसेच कंपनीच्या या ट्रॅक्टरमध्ये यांत्रिक / पॉवर (पर्यायी) स्टीयरिंग दिले आहे, जे शेतात आरामदायी ड्राइव्ह प्रदान करते. हा ट्रॅक्टर 8 फॉरवर्ड + 2 रिव्हर्स गिअरबॉक्ससह सादर केला आहे. हा ट्रॅक्टर सिंगल/ड्युअल (पर्यायी) क्लचसह येतो असून त्यात कॉन्स्टंट मेश प्रकारचे ट्रान्समिशन देण्यात आले आहे. कंपनीचा हा ट्रॅक्टर 6 Splines प्रकारातील पॉवर टेकऑफमध्ये येतो. जो 540 RPM जनरेट करतो. या ट्रॅक्टरमध्ये 2 व्हील ड्राइव्ह दिली आहे, त्यात 6.00 x 16 फ्रंट टायर आणि 13.6 x 28 मागील टायर आहे.

किती आहे किंमत?

किमतीचा विचार केला तर स्वराज 735 XT ट्रॅक्टरची भारतात एक्स-शोरूम किंमत 5.95 लाख ते 6.35 लाख रुपये ठेवली आहे. RTO नोंदणी आणि रोड टॅक्स मुळे स्वराज 735 XT ट्रॅक्टरची ऑन रोड किंमत राज्यांमध्ये बदलते. कंपनी या नवीन ट्रॅक्टरवर 2 वर्षांपर्यंतची वॉरंटी देत आहे.

Leave a Comment