Swadeshi Ecommerce: मुंबई (Mumbai): जागतिकीकरणाच्या काळातही अवघ्या जगात स्वदेशी विरुद्ध विदेशी हा वाद आणि चर्चा कायम आहे. खुली अर्थव्यवस्था असूनही हा मुद्दा जोरात असल्याने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजप सरकारही सक्रिय झाले आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत व्यापारी आणि मध्यमवर्ग यांना आपला वाटणारा स्वदेशी ई-कॉमर्सचा मुद्दा त्यामुळेच जोमत आहे. त्यानुसार ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC / Open Network for Digital Commerce) याची 30 सप्टेंबरपासून बेंगळुरू (Bengaluru) शहरातील 16 पिन कोडमध्ये सुरुवात होत आहे.

सहभागींच्या अर्जाद्वारे टप्प्याटप्प्याने ग्राहकांसाठी हे नेटवर्क आणखी ओपन केले जाणार आहे. बीटा चाचणीच्या मदतीने सध्या ग्राहकांना प्रथमच या नेटवर्कचा अनुभव दिला जाईल आणि मग ONDC त्यांच्याकडून फीडबॅक गोळा करेल. हे संपूर्ण भारतात सुरू करण्यापूर्वी हे नेटवर्क अधिक सक्षम करण्याचा हा प्रयत्न आहे. ONDC हा भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापाराच्या (DPIIT) प्रोत्साहन विभागाचा एक उपक्रम असल्याने अनेकांना याकडून अपेक्षा आहेत. मात्र, केंद्र सरकार इतर सरकारी कंपन्या खासगी क्षेत्राला आंदण देत असताना ई-कॉमर्समध्ये का पदार्पण करत आहे, आणि मग हे यशस्वी होणार का, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. (Department for Promotion of Industry and Internal Trade (DPIIT), Ministry of Commerce, Government of India.)

ग्राहक ONDC अॅपद्वारे किराणा सामान आणि रेस्टॉरंट्समध्ये (groceries and restaurants) ऑर्डर देऊ शकतात. ग्राहक आता नेटवर्कवर सूचीबद्ध केलेल्या प्रत्येक विक्रेत्याकडून खरेदी करू शकतील. यात स्थानिक विक्रेत्यांचा समावेश असून पूर्वी ते डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपस्थित नव्हते विक्रेत्यांसाठी यामुळे अतिरिक्त महसूल निर्मिती होईल. तसेच विद्यमान ग्राहकदेखील त्यांना अॅपद्वारे ऑनलाइन पाहू आणि ऑर्डर करू शकणार आहेत. याबाबत टी. कोशी (MD आणि CEO, ONDC) हे म्हणाले, “भारतातील ONDC आणि ई-कॉमर्ससाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे सर्व विक्रेत्यांना सर्व खरेदीदारांपर्यंत आणि सर्व खरेदीदारांना सर्व विक्रेत्यांपर्यंत पोहोचण्याची संधी देऊन ई-कॉमर्स इकोसिस्टमचे लोकशाहीकरण करेल.” (ONDC will democratize the e-commerce ecosystem by allowing all sellers to reach all buyers and all buyers to all sellers.)

Share.

Leave A Reply

Exit mobile version